Kalicharan Maharaj
Kalicharan Maharaj Saam Tv
महाराष्ट्र

'हनुमान चालीसा म्हणा'; कालीचरण महाराज म्हणाला पाठ नाही, मी तर...

विश्वभूषण लिमये

सोलापूर: राज्यात सध्या भोंग्यावरुन वातावरण तापले आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. मशिदीवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवा नाहीतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश राज यांनी मनसैनिकांना दिले आहे. त्याचबाबत बोलताना स्वयंघोषीत महाराज कालीचरण महाराज म्हणाला की भोंग्याबाबत (loudspeaker) राज ठाकरे (Raj thackeray) यांची भूमिका योग्य आहे.

योगी आदित्यनाथ (Yogi aditynath) यांनी जे केले ते भारतभर (india) झाले पाहिजे अशी भावना कालीचरण महाराजाने व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना कालीचरण महाराजाला हनुमान चालीसा म्हणायला सांगितली असता तो म्हणाला माझी हनुमान चालीसा पाठ नाही, मी तर कालिचा उपासक आहे. (Kalicharan maharaj)

कालीचरण महाराज म्हणाला की भिमा कोरेगाव हिंसाचार (Bhima koregoan case) प्रकरणात भिडे गुरुजी (Sambhaji bhide) यांना क्लिन चिट मिळणे हा हिंदूत्वाचा विजय आहे. गोरक्षांकावर हल्ला होत आहेत या प्रश्नावर कालीचरण महाराज म्हणाले जर राजा हिंदुत्ववादी नसेल तर हे सगळं होणारच. जो राजा हिंदुंचा विचार करणार नाही त्याचा धर्मरक्षकांसाठी काहीच उपयोग नाही. जे हिंदुंच्या गोष्टी करतील तेच देशात राज करतील हे लक्षात घ्या असे कालीचरण महाराज यांनी नमूद केले.

लोकांची आर्थिक स्थिती चांगली झालेली आहे. आर्थिक स्थिती वाढल्याने महागाई वाढली हे लक्षात घ्या. काोणत्या सरकाराच्या काळात महागाई कमी झाली असा प्रतिप्रश्न कालीचरण महाराज यांनी माध्यमांना केला. आम्हांला विकास पाहिजे परंतु तो पण हिंदुत्ववादी विकास पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : शांतीगिरी महाराजांना शिवसेनेची उमेदवारी नाहीच?, अजय बोरस्ते यांची माहिती

Raveena Tandon: रविनाचा दिलकश अंदाज; साडीतील खास फोटो पाहाच!

KKR vs DC,Playing XI: KKR संघात होणार २ मोठे बदल! पृथ्वीला संधी मिळणार का? पाहा कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

PM Modi Pagadi: पंतप्रधान मोदींसाठी खास 'दिग्विजय योद्धा पगडी', पुण्यात होणार भव्य स्वागत

Itching In Foot: पायाच्या तळव्यांना खाज येतेय? करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT