kailash gorantyal Saam TV
महाराष्ट्र

भूमिपूजन तरी माझ्या हातून व्हायला पाहिजे; आमदार गोरंट्याल यांचा टोपेंना टोला

कार्यक्रमाचं भूमीपूजन माझ्या हातून होण्यासाठी ज्ञान असायला पाहिजे होतं, पण तुमच्यावर आमचा परीणाम होत नाही.

लक्ष्मण सोळुंके

जालना: आज जालन्यात राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या कार्यालयाचं भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यालयाच्या भूमीपूजनावरून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यावर जबरदस्त टोलेबाजी करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण करून उपस्थितांना खदाखदा हसवले. टोपे हे आरोग्यमंत्री असल्यानं त्यांच्या हातून महाविद्यालयं किंवा हॉस्पिटलचं भूमिपूजन व्हायला पाहिजे.

माझ्याकडे हॉटेल आहे शिवाय 1986 पासून मी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ग्राहक (State Excise Department) आहे त्यामुळे या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा मान मला मिळायला पाहिजे होता असं विधान गोरंट्याल यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या कार्यक्रमाचं भूमीपूजन माझ्या हातून होण्यासाठी ज्ञान असायला पाहिजे होतं, पण तुमच्यावर आमचा परीणाम होत नाही.

दर्शना वाल्यांवर आमचा परीणाम होतो असा टोला अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता गोरंट्याल यांनी खोतकर यांना लगावला, तर व्यासपीठावर बसलेल्या बबलू चौधरी यांचं नाव घेत भाषणाच्या शेवटी गोरंट्याल यांनी खाब, गुलाब, जहेर, दवा, बता क्या-क्या है.? मै आ गया हू बता इंतजाम क्या क्या है, श्याम को आ रहा हू असं म्हणत गोरंट्याल यांनी भाषण संपवलं. तर व्यासपीठावर उपस्थित पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्वांनी त्यांना दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला ही केला.

मात्र राज्यात जरी आघाडी सरकार व्यवस्थित चालत असले तरी जिल्ह्यात मात्र विविध कामाच्या भूमिपूजन समारंभ, उदघाटन या वरून राजकारण सुरू असल्याचे चित्र या कार्यक्रम प्रसंगातून समोर आलं आहे. या पूर्वी ही आमदार गोरंट्याल यांनी टोपे जिल्हानियोजना समितीच्या निवडी वरून राजेश टोपे यांच्या मनमानी कारभारावर वरिष्टकडे तक्रार केली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

Dhananjay Munde : पोलिसांना आडनाव लावता येत नसेल तर....; आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून समाजातील समतेवर प्रश्नचिन्ह

Shocking: स्पाय कॅमेरा अन् ७४ तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ; विमानातील पायलटचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT