Wreckage of Jitendra Shelke’s car after the fatal crash on Samruddhi Expressway that sparked conspiracy concerns. saam tv
महाराष्ट्र

खरातच्या ट्रस्ट उपाध्यक्षाचा घात? 'बड्या धेंडांची नावं दाबण्यासाठी शेळकेंना संपवलं'

Jitendra Shelke Death Accident: भोंदू अशोक खरातचे निकटवर्तीय आणि खऱातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू झालाय...मात्र खरातच्या एन्काऊटरच्या चर्चा रंगलेल्या असतानाच शेळकेंच्या अपघाती मृत्यूवरून संशयाचं धुकं निर्माण झालयं... त्यामुळे शेळकेंचा अपघात आहे की घातपात?

Suprim Maskar

समृद्धी महामार्गावर झालेल्या या भीषण अपघाताचा संबंध थेट खरात प्रकरणाशी आहे...कारण याच कार अपघातात मृत्यू झालाय तो भोंदू अशोक खरातचे निकटवर्तीय आणि खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळकेंचा.. समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला शेळके यांच्या कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला..

यात शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचारा सुरू आहे. शेळके हे खरातच्या सर्व व्यवहारांचे साक्षीदार होते. आणि त्यामुळेच त्यांचा घातपात केला का असा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान खरात प्रकरणातील साक्षीदारांना संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर शेळकेंनंतर आता खरातही संपवलं जाऊ शकतं असा संशय सुषमा अंधारेंनी व्यक्त केलाय.

दुसरीकडे मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्यात ज्यापद्धतीनं साक्षीदारांना संपवण्यात आलं होतं, तोच प्रकार खरात प्रकरणात सुरु असल्याचा संशय काहींनी उपस्थित केलाय. मात्र जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूनंतर ट्रस्टवरील इतर विश्वस्तांच्या सुरक्षेचं मोठं आव्हानं पोलीस प्रशासनासमोर आहे... खरातच्या ट्रस्टमध्ये कोणाकोणाचा सहभाग होता.

खरातच्या शिवनिका ट्रस्टचे विश्वस्त

अशोक खरात अध्यक्ष

डॉ. जितेंद्र शेळके उपाध्यक्ष

कल्पना खरात सरचिटणीस

रुपाली चाकणकर सदस्या

सुभाषराव गमे सदस्य

ललित पोफळे(C.A) सदस्य

नंदकिशोर कातोरे सदस्य

दुसरीकडे उपाध्यक्षांच्या अपघाती मृत्यूचा सखोल तपास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. जितेंद्र शेळके हे शिर्डी येथील महत्त्वाच्या जमीन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार होते. खरात प्रकरणात शेळकेही तणावात असल्याची चर्चा असतानाच त्याच्या अपघाती मृत्यवर संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा 'अपघात' आणि 'घातपात' अशा दोन्ही बाजूंनी तपास करणं गरजेचं आहे.अन्यथा बड्यांना वाचवण्यासाठी वर्षानुवर्ष चालणारी घातपाताची सत्र अशीच सुरु राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जामनेर रोडवरील दुकानासमोर उभी असलेल्या रिक्षाने घेतला अचानक पेट

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय, गौण खनिज साठ्यांचे ETS प्रणालीद्वारे होणार सर्वेक्षण

महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच सत्ताधारी आक्रमक; अवघ्या काही तासांत घेतला मोठा निर्णय

Daisy Shah : त्यानं खोलीत बोलावलं, माझा हात धरला अन्...प्रसिद्ध अभिनेत्रीचा निर्मात्यावर गंभीर आरोप

खरात, अयाननंतर आणखी एक व्हिडिओकांड! ५०० महिला, प्रायव्हेट व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग, तरुणाच्या कृत्यानं सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT