Sanyogita Raje Chhatrapati Jitendra Awhad Saamtv
महाराष्ट्र

Jitendra Awhad News: छत्रपतींच्या वारसांना अशी वागणूक तर बाकीच्यांच काय? संयोगिता राजेंच्या 'त्या' व्हायरल पोस्टनंतर जितेंद्र आव्हाड संतापले

Nashik News: शाहू महाराजांच्या वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आले, ज्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे...

Gangappa Pujari

Sanyogitaraje Chhatrapati: छत्रपती शाहू महाराजांविषयीचे वेदोक्त प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र उच्चारण्यास नकार दिला होता. ज्याविरोधात त्यांनी मोठा लढाही दिला होता. आता १२२ वर्षानंतर पुन्हा एकदा हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

याचे कारण म्हणजे शाहू महाराजांच्या वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आले. स्वतः संयोगिता राजेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

काय आहे संपूर्ण प्रकरण...

काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात पूजा करताना मंदिरातील तथाकथित महंतांनी 'पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील असल्याने मी त्यास विरोध दर्शवला. मात्र वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे महंतांनी सांगितले, अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजेंनी रामनवमीच्या दिवशी केल्याने चर्चांना एकच उधाण आले आहे.

मागच्या महिन्यात संयोगिताराजे या संभाजी छत्रपती यांच्यासोबत नाशिकच्या (Nashik) काळाराम मंदिरात गेले होते. यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला आहे. त्यांची ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावरं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

संयोगिता राजे यांची पोस्ट...

हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या ,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे. हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे..

नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली!

मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच... तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले.

जितेंद्र आव्हाड संतापले...

हा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संताप व्यक्त केला आहे. "काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा, छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? त्यांनी उत्तर दिले नाही तुम्हाला अधिकार नाही, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी बर झाले हे छत्रपतींच्या वारसं बरोबर झाले जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात अजुन कुठला पुरावा हवा आजचे छत्रपतींन च्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचे काय? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT