Jitendra Awhad On Prakash Ambedkar Saam TV
महाराष्ट्र

Jitendra Awhad On Prakash Ambedkar: लग्न एकाशी आणि हुंडा दुसऱ्याकडून...; प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर आव्हाडांचं प्रत्युत्तर

Maharashtra Political News: अशात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील या सोहळ्याला उपस्थित होते. शरद पवार मोदींच्या सोहळ्यात उपस्थित राहिल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती. अशात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

लग्न एकाशी करायचं आणि हुंडा दुसऱ्याकडून घ्यायचा असं आम्ही करत नाही, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) ट्वीटवर जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra awhad) प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

जेव्हा तुम्ही गोष्टी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता, तेव्हा तुम्हाला कळते की #GormintAunty अगदी बरोबर होती. जर तुम्हाला द्वेष,जातिवाद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्याच्या बाजूने जायचे असेल तर ते करा. तुमच्या ब्रेकअप स्टंटने महाराष्ट्र आणि भारतातील लोकांना फसवू नका, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं.

तसेच आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी पुढे लिहिलं आहे की, शरद पवरा हे नेहमीच दुटप्पी भूमिकेत असतात. एकाशी लग्न करून दुसऱ्यासोबत संसार थाटतात. त्यामुळे यावरुन जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश आंबेडकराना प्रत्युत्तर दिलंय. लग्न एकाशी करायचं आणि हुंडा दुसऱ्याकडून घ्यायचा असं आम्ही करत नाही, असा टोला अव्हाडांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT