jiten gajaria saamtv
महाराष्ट्र

अजित पवार व रश्मी ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचा माफीनामा !

महाराष्ट्र भाजप (BJP) आयटी सेलचा (IT Cell) प्रभारी जितेन गजारिया याने बीकेसी सायबर पोलिसांना माफीपत्र लिहून दिल्यावरच त्याची सूटका करण्यात आल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामनाच्या उपसंपादक व मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजप पदाधिकारी जितेन गजारिया (Jiten Gajaria) याने अखेर ट्विटबाबत लेखी माफी मागितली आहे.

( Jiten gajaria Offensive Tweet)

हे देखील पहा :

जितेन गजारियाच्या माफी पत्रानंतरच त्याची बीकेसी पोलिस स्टेशन मधून सुटका करण्यात आलीय. महाराष्ट्र भाजप आयटी सेलचा ( BJP IT Cell) प्रभारी जितेन गजारिया याने बीकेसी सायबर पोलिसांना माफीपत्र लिहून दिल्यावरच त्याची सूटका करण्यात आल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

जितेन गजारिया याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची लेखी माफी मागितली आहे. तसे माफी पत्र जितेन गजारिया याने बीकेसी सायबर पोलिसांना दिले आहे. त्यानंतरच जितेन गजारीया याची पोलिस स्टेशनमधून सूटका करण्यात आल्याची माहीती मिळतेय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

Summer Skin Care Tips: उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' ५ गोष्टी; त्वचा काळी पडणार नाही

SCROLL FOR NEXT