Manasvi Choudhary
उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. कडक उन्हांत बाहेर पडल्यानंतर त्वचा काळी होते त्वचेवर परिणाम होतो.
उन्हाळ्यात बाहेर गेल्यानतर त्वचा काळी पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी किमान २० मिनिटे आधी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन लावा.
चेहऱ्यासाठी कोरफड अत्यंत गुणकारी आहे. चेहऱ्यावर कोरफडचा जेल लावल्याने त्वचेवर होणारी जळजळ कमी होते व त्वचा टॅन होत नाही.
काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि उन्हामुळे त्वचेवर काळे डाग पडत नाही. त्वचेच रक्षण होते.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर गुलाबपाणी लावावे. गुलाबपाणी त्वचेवर लावल्याने त्वचा कोरडी होत नाही.
जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर नारळ तेलाचा पातळ थर लावा. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि सनबर्न रोखते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.