Jio Recharge Saam TV
महाराष्ट्र

Jio Recharge : जिओ कंपनीची बंपर ऑफर; फक्त १ रुपयात मिळणार रिचार्ज; या स्टेप्स फॉलो करून घ्या सेवेचा लाभ

जिओ कंपनीने चक्क १ रुपयांची रिचार्ज ऑफर ठेवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jio Recharge : मोबाईल फोन शिवाय आज कोणतीही व्यक्ती राहू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाईल फोन फार महत्वाचा झाला आहे. प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर देत असते. यात रिचार्जच्या देखील ऑफर असतात. तसेच ग्राहकांना देखील कमीतकमी पैशांत जास्तीचा रिचार्ज हवा असतो. अशात आता जिओ कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. (Latest Jio Recharge Offer)

या ऑफरची माहिती ऐकून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल. आजवर तुम्हाला फुल टॉक टाईम सारख्या ऑफर असलेले रिचार्ज मिळाले असतील. यात पैशांची देखील सवलत असेल मात्र जिओ कंपनीने चक्क १ रुपयांची रिचार्ज ऑफर ठेवली आहे. यामुळे सर्वच ग्राहक फार आनंदी आहेत. आता हा १ रुपयांचा रिचार्ज नेमका कसा करायचा याची माहिती जाणून घेऊ.

१ रुपयांच्या रिचार्जमध्ये कोणत्या सुविधा आहेत?

फक्त जिओ (Jio) या कंपनीनेच १ रुपयांच्या रिचार्जची ऑफर ठेवली आहे. ही ऑफर काही काळासाठीच मर्यादीत आहे. यात तुम्हाला संपू्र्ण १ GB डाटा रिचार्ज मिळेल. हा रिचार्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या काही अटी मान्य करणे अनिवार्य असेल. आतापर्यंत अनेक व्यक्तींनी या ऑफरचा लाभ घेतला आहे.

कसा करायचा रिचार्ज?

हा रिचार्ज तुम्हाला वावचर स्वरूपात मिळेल. यासाठी तुम्हाला जिओच्या अधिकृत क्रमांकावर एक मॅसेज करावा लागेल. युजर्सना त्यांच्या व्हॉट्सअॅप (Whatsapp) क्रमांकावर +९१ ७०००७७०००७ हा क्रमांक सेव करून त्यावर मॅसेज करावा लागेल. मॅसेज केल्यावर तुम्हाला त्यावर जिओ सीम रिचार्जचा रिप्लाय येईल. त्यात तुम्हाला रिचार्ज फॉर फ्रेंन्ड हा पर्याय निवडावा लागेल. त्यात तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा जिओ क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील. त्यातील १ रुपयांच्या रिचार्जचा पर्याय निवडल्यावर तुम्हाला १ GB डाटा रिचार्ज मिळेल.

असा भरा १ रुपया

१ रुपयाचा रिचार्ज करताना तुम्हाला व्हॉट्सअॅप पे हा पर्याय निवडावा लागेल. यासाठी तुम्हाला रिचार्ज करताना पे या बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही व्हॉट्सअॅप पे मध्ये पोहचाल. तिथे अॅक्सेप्ट अॅंन्ड कंटीन्यू केल्यावर तुमचे बॅंक खाते सिलेक्ट करावे लागेल. विचारलेली इतर सर्व माहिती भरल्यावर एक UPI ID दिसेल. त्यानंतर व्हॉट्सअॅप पे मार्फत तुमच्या खात्यातुन एक रुपया कट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pen Fort : इतिहासप्रेमी अन् ट्रेकर्ससाठी पर्वणी! पेणजवळील 'या' ५ किल्ल्यांची सफर तुम्हाला नक्की आवडेल

Protein Supplements: प्रोटीन सप्लीमेंटमुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या व्यक्तींना असतो धोका

Ramayana Collection : रणबीर कपूर-यशच्या 'रामायण'ची जगभरात धूम! १,११० कोटींची कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड

Shocking : मोठी बातमी! भाजप नेत्याच्या धावत्या कारला भीषण आग; दोघांनी कारमधून उडी मारली अन्...

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळी परिस्थितीत अमरावतीत नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर ओली पार्टी रंगली

SCROLL FOR NEXT