jihe kathapur yojana to be inaugurated by pm modi says mla jaykumar gore saam tv
महाराष्ट्र

Jaykumar Gore : पाण्यावरुन शरद पवारांसह रामराजेंवर जयकुमार गाेरे बरसले, 'आम्ही करुन दाखवलं' (पाहा व्हिडिओ)

ही योजना पूर्ण होताना बघून समाधान व्यक्त होत आहे अशी भावना आमदार जयकुमार गाेरेंनी व्यक्त केली.

ओंकार कदम

Satara News :

जिहे कटापुर पाणी योजनेतील (jihe kathapur yojana) नेर तलाव ते आंधळी तलावापर्यंत 14 किलोमीटरच्या बोगद्याचे काम पूर्णत्वास आले आहे. या बोगद्याची पाहणी दाै-यानंतर आमदार जयकुमार गोरे (mla jaykumar gore) यांनी खासदार शरद पवार (ncp president sharad pawar) आणि तत्कालीन मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न टिकेची झाेड उठवली. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याेजनेसाठी माेलाचे सहकार्य केले. ही याेजना पुर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी (PM Modi) यांच्या हस्ते उदघाटन तसेच पाणी पूजन हाेईल असेही आमदार गाेरे यांनी नमूद केले. (Maharashtra News)

आमदार जयकुमार गोरे यांनी माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता पृथ्वीच्या अंता पर्यंत या भागात पाणी येणार नाही असे काहींनी बोलून दाखविले हाेते. हे काम अडवून ठेवलं होते. तसेच या भागावर राज्य करणारे जाणते राजे सुद्धा याच भागातून खासदार झाले पण त्यांचं ही म्हणणं होत पाणी नाही तर द्यायचं कुठून ? अशी जळजळीत टीका आमदार जयकुमार गोरे यांनी खासदार शरद पवार यांचे नाव न घेता केली.

मागील 12 वर्षापासून या बोगद्याचे काम सुरू होते. माण- खटाव मधील किमान 60 गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. गेल्या 22 वर्षापासून शासकीय मान्यता असणारी योजना केवळ मंजूर झाली होऊन तशीच राहिली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार जयकुमार गोरे यांच्या काळात 287 कोटीची योजना आता 2500 कोटी पर्यंत गेली असून या जिहे कटापुर योजनेची पाहणी करत असताना आमदार जयकुमार गोरे यांनी आज ही योजना पूर्ण होताना बघून समाधान व्यक्त होत आहे अशी भावना साम टिव्हीशी बोलताना व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Astrology: स्वप्नात 'या' गोष्टी दिसणं असतं शुभ, धनलाभागाचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: रेल्वे युनियनच्या 2 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Sindhudurg Tourism : हिवाळ्यात सिंधुदुर्गमधील 'हे' अनोखं ठिकाण पाहा, आयुष्यभर ट्रिप विसरणार नाही

Sangli : सांगलीत 'मुळशी पॅटर्न'! दलित महासंघाच्या अध्यक्षांच्या हत्येनंतर आणखी एकावर हल्ल्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Politics: NCP शरद पवार गटाला भाजपचा मास्टरस्ट्रोक, बड्या नेत्यासह सरपंच-उपसरपंचांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT