Jaykumar Gore  Saam Tv
महाराष्ट्र

Jaykumar Gore: 'माझ्या पाठीशी देवाभाऊ, कुणीही वाकडं करू शकत नाही', जयकुमार गोरेंचा रोख कुणाकडं?

Maharashtra Politics: कुणी कितीही काळ्या भावल्या बांधा. माय माऊली आणि जनता माझ्यासोबत आहे.' असं मोठं विधान जयकुमार गोरे यांनी केले आहे. जयकुमार गोरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Priya More

'माझ्या पाठीशी देवा भाऊ आहेत. माझं कुणीही वाकडं करू शकत नाही', असं वक्तव्य करत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी थेट विरोधकांना इशारा दिला. एका महिलेच्या प्रकरणावरून सध्या जयकुमार गोरे चर्चेत आहेत. अशामध्ये त्यांनी हे विधान केले आहे त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. 'कुणी कितीही काळ्या भावल्या बांधा. माय माऊली आणि जनता माझ्यासोबत आहे.' असं जयकुमार गोरे यांनी सांगितले. जयकुमार गोरे यांच्या या धक्कादायक विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

एका महिलेला नग्न फोटो पाठविल्याच्या आरोपावरून वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुफानी टोलेबाजी करत आपल्यावरील आरोपांना जोरदार उत्तर दिले. 'माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्याविरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ- संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळया भावल्या बांधत आलेत . मात्र जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या आणि कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही.' असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला.

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटन समारंभात शनिवारी रात्री जयकुमार गोरे बोलत होते. या कार्यक्रमात गोरे यांनी मोहिते पाटील यांना दे धक्का देत पिलीव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते आणि मोहिते गटाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माढ्याचे माजी खासदार रणजीत निंबाळकर आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT