विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी
Jaykumar Gore vs Praniti Shinde : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व विजयानंतर भाजपमधील सर्वच नेत्यांना आत्मविश्वास आला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर येथे प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करतना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दोन कदम पिछे नही हटे....50 कदम नीचे गिरे....वो भी टांग उपर असे वक्तव्य गोरेंनी केलेय. गोरेंच्या या वक्तव्यानंतर सोलापूरमधील लोकांकडून संताप व्यक्त केला.
महापालिका पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी एक भावनिक पत्र काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी लिहिलं होतं. पत्राच्या शेवटी हिंदीतून प्रणिती शिंदेंनी "झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं.... पर सिर्फ अगली छलांग लगाने" यावर टीका करताना पालकमंत्री जयकुमार गोरेंची जीभ घसरली. दो कदम पिछे नही हटे.....50 कदम निचे गिरे है वह भी टांग उपर अशा शेलक्या भाषेत जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदें बाबत बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
जयकुमार गोरेचं वादग्रस्त वक्तव्य
पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बोलताना आत्मविश्वास व्यक्त केला. अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा नारा दिला आहे. पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदेंच्या त्या भावनिक पत्रावर वादग्रस्त आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे."दो कदम पिछे नही हटे.....50 कदम निचे गिरे है वह भी टांग उपर" अशा भाषेत जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेंवर टिप्पणी केल्याने काँग्रेस पक्षाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.