Beed News
Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed : जयदत्त क्षीरसागरांकडून भाजपचा वापर; संदीप क्षीरसागर यांचा काकांवर गंभीर आरोप...

विनोद जिरे

Beed Latest News : बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा वाद सर्वश्रुत आहे. आता पुन्हा एकदा काका जयदत्त क्षीरसागर यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याने, पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकांवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

काका जयदत्त क्षीरसागरांकडून (Jaydutta Kshirsagar) भाजप आणि भाजपमधील नेत्यांचा वापर केला जातोय. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केलाय. त्यामुळे त्यांनी आता इकडे तिकडे न करता निवडणुकीसाठी चिन्ह घेऊन समोर यावं असं खुलं आव्हान पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना दिलंय.

काकांची भाजपसोबत (BJP) जवळीक वाढत आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर संदीप क्षीरसागर म्हणाले की, माझ्यासहित बीड मतदार संघात इतरांना देखील हा प्रश्न पडला आहे की ते आहेत कुठे आणि त्यांची भूमिका काय, करणं राजकारणामध्ये भूमिका ही स्पष्ट असावी लागते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केला आहे हा त्यांचा इतिहास आहे असे देखील संदीप क्षीरसागर यावेळी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Tips: स्वयंपाकघरातील 'या' दोन गोष्टीमुळे केस होतील लांब

Ear Bud Use : इअर बड्सने कान साफ करताय? सावधान! बहीरे होण्याआधी जाणून घ्या योग्य पद्धत

Coconut Water Benefits: नारळ पाणी कधी प्यावे? ही आहे योग्य वेळ

Aeroplane Viral Video: झोप महत्वाची! विमानात झोपण्यासाठी आजीबाईंचा अनोखा जुगाड; सामानाच्या जागेत झोपल्या ; पाहा VIDEO

Today's Marathi News Live : जे बोलणार, ते करून दाखवणार; शांतीगिरी महाराज यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT