Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

निकालाआधीच बावड्यात झळकले जयश्री जाधवांच्या विजयाचे पोस्टर!

आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात झाली आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे या जागेची पोटनिवडणूक झाली . या पोटनिवडणुकीत एकूण 15 उमेदवारांनी नशीब आजमावले असले तरी मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. काँग्रेसकडून (Congress) दिवंगत आमदार यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून सत्यजित कदम उमेदवार आहेत. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात झाली आहे.

हे देखील पहा -

दरम्यान निकालआधीच जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टर्स बावड्यात झळकले आहे. आमदार झाल्याबद्दल जयश्री जाधवांचे अभिनंदन असे या पोस्टर्सवर लिहिण्यात आले आहे. पहिल्या तीन फेऱ्यात जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. चौथ्या फेरीअखेर काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना १९००८ मतं तर भाजपचे सत्यजीत कदम ११७३५ मतं मिळाली आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा 'ॲक्शन मोड'वर! आता राज्यातील रुग्णालयांना दिला थेट कारवाईचा इशारा; काय आहे कारण?

Gautami Patil : "हिल हिल पोरी हिला तुझ्या प्रेमात झालो फिदा..."; गौतमी पाटीलचा नखरा पाहून नेटकरी घायाळ, 'ते' Photos आले समोर

Bleeding Gums: दात घासताना हिरड्यांतून रक्त येतंय? दुर्लक्ष करू नका; असू शकते गंभीर समस्येची सुरुवात

Maharashtra politics : राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार? 'एनडीए'चा मोठा प्लॅन

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन, प्रमोशन अन् सॅलरीत वाढ होणार, मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT