Jayant Patil warns Gopichand Padalkar — NCP-BJP verbal war turns intense in Maharashtra politics. saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil vs Padalkar: गोपीचंद पडळकरांना मारणार; जयंत पाटलांची हाणामारीची भाषा

Jayant Patil warns Padalkar : टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम, म्हणणाऱ्या जयंत पाटलांनी आता अखेर गोपिचंद पडळकरांच्या टीकेवर मौन सोडलंय.. मात्र जयंत पाटील नेमकं काय म्हणालेत? आणि गोपिचंद पडळकरांना कसा धडा शिकवण्याचा इशारा दिलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

  • जयंत पाटील यांनी गोपिचंद पडळकरांवर हाणामारीचा इशारा दिला.

  • पडळकरांनी पाटील यांच्या आईवडिलांवर केलेल्या टीकेवरून वाद पेटला.

  • राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढलाय.

ऐकलंत भाजपचा असंस्कृत चेहरा गोपीचंद पडळकरने केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेवर अखेर महिनाभरानंतर जयंत पाटलांनी मौन सोडलंय आणि माझ्या आईवडिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही, असं म्हणत जयंत पाटलांनी थेट हाणामारीची भाषा केलीय.

खरंतर सतत वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या गोपिचंद पडळकरांनी सांगलीत जयंत पाटलांच्या वडिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं.. तर मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावल्यानंतरही गोपिचंद पडळकरांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांबद्दल गरळ ओकली.

खरंतर टप्प्यात कार्यक्रम करणं, ही जयंत पाटलांची स्टाईल..आता जयंत पाटलांनी गोपिचंद पडळकरांचं नाव न घेता हाणामारीची भाषा केलीय.. त्यामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात पेटलेला जयंत पाटील विरुद्ध गोपिचंद पडळकर वाद आणखी टोकाला जाणार...हे मात्र निश्चित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI चा मोहसिन नकवीला दणका, आशिया कप ट्रॉफी न दिल्याने ACCचं संचालकपद जाणार?

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अ‍ॅक्टिव मोडमध्ये

Singer Died: प्रसिद्ध गायकाचे ३५ व्या वर्षी निधन, संगीत विश्वावर शोककळा

Skin Care Tips: ग्लोइंग स्कीनसाठी 'हे' ज्यूस ठरतील फायदेशीर, चेहऱ्यावर त्वरीत दिसेल फरक

रस्त्यावर वाढदिवस, हातात तलवार...थेट कायद्याला आव्हान|VIDEO

SCROLL FOR NEXT