Union Budget 2022 Reactions: हा तर निवडणूक संकल्प; अर्थसंकल्पावर जयंत पाटलांची टीका Saam TV
महाराष्ट्र

Union Budget 2022 Reactions: हा तर निवडणूक संकल्प; अर्थसंकल्पावर जयंत पाटलांची टीका

अर्थसंकल्प 2022 मधून आपल्याला काय मिळेल याची उत्सुकता सर्वसामान्य जनता, शेतकरी ते उद्योग विश्वाला अनेक दिवसांपासून लागून होती.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ मोठ्या घोषणा केल्या आहेत मात्र विरोधकांकडून यावरती टीका केली जात आहे. आजचा हा अर्थसंकल्प नव्हे तर निवडणूक संकल्प असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.

आज सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसंच देशात आता नव्या ४०० वंदे भारत रेल्वे सुरु करणार आहेत तर जवळपास ६० लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.

मात्र त्यांनी केलेल्या या अर्थसंकल्पामध्ये नोकरदार वर्गाची मोठ्या प्रमाणावरती निराशा झाली आहे. कारण यामध्ये आयकर कर प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारती बदल करण्यात आलेला नाही.

आणि यावरुनच आता विरोधकांच्या टीका या अर्थसंकल्पावरती होत आहेत, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत हा अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प असल्याची टीका केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT