Manasvi Choudhary
तरोटा ही पावसाळ्यात मिळणारी औषधी वनस्पती आहे. तरोट्याची भाजी देखील तुम्ही बनवून खाऊ शकता.
शरीरासाठी आरोग्यदायी असणारी तरोटा भाजी अत्यंत चवदार लागते. तरोटा भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी बनवू शकता.
भाजी बनवण्यासाठी तरोटा, कांदा, लाल मिरची आणि मीठ हे साहित्य घ्या.
सर्वातआधी तरोटा भाजी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
नंतर गॅसवर कुकरमध्ये मीठ टाकून तरोटा भाजी छान शिजवून घ्या.
नंतर कुकर थंड करा तरोटा भाजी गाळणीने गाळून त्यातील पाणी काढून टाका.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, बारीक चिरलेला कांदा टाकून सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
नंतर या मिश्रणात लाल मिरची, हळद, मीठ टाकून मिक्स करा. तरोटा भाजी टाकून संपूर्ण मिश्रण एकजीव करा. अशाप्रकारे तरोटा भाजी घरच्या घरी तयार होईल.