Shreya Maskar
अनेकांना जेवल्यावर पटकन ढेकर येण्यास सुरुवात होते. जे की आरोग्यासाठी चांगले नाही. वारंवार येणारे ढेकर थांबवण्यासाठी हे घरगुती उपाय करा.
जेवणानंतर १०-१५ मिनिटे चाला. यामुळे पोटातील अन्न पुढे सरकण्याची प्रक्रिया जलद होते आणि अडकलेला वायू पचनमार्गातून सहजपणे बाहेर पडण्यास मदत होते.
आले नैसर्गिकरित्या पचनसंस्थेतील जळजळ शांत करते आणि पचनास मदत करते. कॅमोमाइल चहा पोटाला आराम देण्यासाठी आणि ॲसिड रिफ्लक्सचा (आम्लपित्ताचा) त्रास कमी करण्यासाठी ओळखला जातो.
जेवणानंतर एक चमचा बडीशेप चावून खाल्ल्याने पचन सुधारते आणि आतड्यातील वायू बाहेर पडण्यास मदत होते.
जेवताना निवांतपणे आणि अन्न नीट चावून खाल्ल्याने जेवताना तुम्ही खूप कमी हवा गिळता. कार्बोनेटेड पेये पिणे टाळा. तसेच पंख्याच्या खाली बसून जेवणे टाळा.
जेवल्यानंतर लगेच आडवे पडणे किंवा झोपणे टाळा. ताठ स्थितीत राहिल्याने गुरुत्वाकर्षणामुळे अन्न नीट पचण्यास मदत होते आणि ॲसिड रिफ्लक्समुळे अधिक ढेकर येण्यापासून प्रतिबंध होतो.
लिंबू पाणी हे ढेकरवर रामबाण उपाय आहे. तुम्ही यात चिमूटभर बेकिंग सोडा देखील टाकू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.