Shreya Maskar
तुमच्या छातीत किंवा पोटात मळमळत असेल तर आले आवर्जून खा. आल्याचा रस प्यायलात तर यावर लगेच आराम मिळेल. आले पाण्यात भिजवा आणि खा.
पुदिना पचनसंस्थेच्या स्नायूंना आराम देते. पुदिन्याचा चहा प्यायल्याने पोटातील पेटके कमी होऊ शकतात. यामुळे उलटी आणि मळमळ हा त्रास थांबतो.
जेवताना कोरडा पदार्थ, पांढरा भात यांसारखे साधे, पिष्टमय पदार्थ खा. हे पचनसंस्थेला त्रास न देता पोटातील आम्ल शोषून घेतात आणि मळमळ थांबवतात.
लिंबू आणि आंबट पदार्थांमुळे मेंदूचे लक्ष विचलित होते, ज्यामुळे पोटाला आराम मिळतो. लिंबाच्या गोळ्या खा, ताज्या कापलेल्या लिंबाचा वास घ्या, तसेच कोमट लिंबू पाणी प्या.
तुम्हाला मळमळायला लागल्यावर दीर्घ श्वास घ्या आणि मोकळ्या जागेत येऊन, ताजी हवा खा. तसेच आजूबाजूची खिडकी उघडल्याने मळमळ कमी होऊ शकते.
तुमच्या कपाळावर किंवा मानेच्या मागच्या बाजूला थंड, ओलसर कापड ठेवल्याने शरीराचे तापमान कमी होण्यास आणि मळमळ कमी होण्यास मदत होते.
मळमळ असेल तर एकाच वेळी भरपूर पाणी पिण्यापेक्षा थोडे थोडे पाणी प्यावे. थंड पाणी प्यावे, पातळ सूप किंवा फळांचा ज्यूस प्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.