jayant patil
jayant patil  saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil : कर्नाटक सरकारकडून गैरवापर सुरु, लोक त्याला बळी पडणार नाहीत: जयंत पाटील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली : सांगलीतील  (Sangali) जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकारने गंभीरपणे विचार करत आहे, असं खळबळजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक सरकारने गैरवापर करण्याची सुरुवात केली आहे. जत तालुक्यातील लोक त्याला बळी पडणार नाहीत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 65 गावांचा पाण्याचा प्रश्न होता. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यावर तो प्रश्न मी स्वतः जलसंपदा मंत्री असताना प्रयत्न सुरु केले. 11 ऑगस्ट 2021 ला वारणा प्रकल्पात फेर नियोजनाला मान्यता दिली. त्यानंतर 6 टीएमसी पाणी उपलब्ध झालं. या योजनेचा लाभ या गावांना मिळणार आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

इतरांचं सरकार असताना या गावांना न्याय द्यायची भावना नव्हती. मात्र आम्ही तो निर्णय घेतला आता फक्त टेंडर काढण्याची गरज आहे. सरकारच्या समोर एवढाच प्रश्न आहे तो सोडवावा. राज्य सरकारने हा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणीही जयंत पाटलांनी केली.

तसेच जतमध्ये पूर्वी पाणी मिळत नसल्यामुळे गावांनी तसा ठराव केला होता. मात्र आता चित्र बदलले आहे. त्याआधारे कर्नाटक सरकारने गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. जत तालुक्यातील लोक त्याला बळी पडणार नाहीत, असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relation Tips: नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी करा 'या' नियमांचे पालन

Health Tips: दुधासोबत या गोष्टी खाऊ नये,आरोग्य बिघडेल

Sanju Samson Statement: कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही संजूने या खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

Adani Group News: अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस, नेमकं काय आहे कारण?

Today's Marathi News Live : नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार, गणेश नाईक देखील उपस्थित असणार

SCROLL FOR NEXT