>> विजय पाटील
सांगली : शिवसेनेनंतर (Shivsena) राज्यातील आणखी एक मोठा पक्ष फुटण्याच्या वाटेवर आहे का? भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या (Gopichand Padalkar) एका वक्तव्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहेत. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल. त्यानंतर बारामती, मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला असेल. काही दिवसांनी राष्ट्रवादी विसर्जित करून 90 टक्के लोक भाजपमध्ये येतील, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील उटगी येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर हे बोलत होते. (Maharashtra News)
राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय होतं तिथेच आता भाजपचं कार्यालय सुरु झालं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आता भाजपचा झेंडा आहे. हाच झेंडा येत्या काळात जयंत पाटलांच्या घरावर दिसेल, असं भाकित गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं की, गोपीचंद पडळकर प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करत असतात. सुदैवान त्यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना राज्याचा, जिल्हाच्या आणि समाजाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत करावं.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चिंता करु नये. राष्ट्रवादीचं काम जनता गेली अनेक वर्ष पाहत आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकरांकडे लोकांन सांगायला स्वतचं कर्तृत्व नाही, त्यामुळे ते राष्ट्रवादीवर टीका करत राहतात. यातून त्यांनी किती प्रसिद्धी मिळवली हा चिंतनाचा विषय आहे, असं प्रत्युत्तर महेश तपासे यांनी दिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.