Shivsena News: उद्धव ठाकरेंना घाबरुन सगळे एकत्र येतील, पण ठाकरे सर्वांना पुरुन उरतील: अंबादास दानवे

Ambadas Danve News: आता हे तिन्ही नेते एकत्र येत महायुती स्थापन करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSaam TV

Ambadas Danve News: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवे हे सध्या औरंगाबादेत आहेत. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरलं आहे. शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपशी युती केली आहे. तर मनसेदेखील भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक साधताना दिसते. नुकत्याच मनसेच्या मुंबई येथील दीपोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र दिसले होते. त्यामुळे आता हे तिन्ही नेते एकत्र येत महायुती स्थापन करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबबात शिवसेना नेते अंबादास दानवे यांना विचारलं असता त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. (Shivsena Latest News)

Ambadas Danve News
ST Bus Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसला भीषण अपघात; अपघातात बस उलटली

काय म्हणाले अंबादास दानवे?

शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप-शिंदे गट- मनसे यांच्या महायुतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या ताकदीने घाबरून हे (शिंदे गट-भाजप-मनसे) एकत्र येतील, पण उद्धव ठाकरे त्यांना पुरून उरतील असं इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे महायुती होण्याआधीच शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिलं गेलं आहे.

दरम्यान अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारच्या विविध धोरणांवरही टीका केली आहे. दानवे म्हणाले, महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलयं, कधी नव्हे तशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. मी काल पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात गेलो होतो, 175 टक्के पाऊस झाला आहे. जुलैमध्ये झालेल्या नुकसणीबाबत 3 हजार 400 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मदत पोहचू शकली नाही असा आरोप अंबादास दानवेंनी केला आहे. तसेच अडीच, पावणे-तीन महिने कंबरेइतकं पाणी थांबलय, सध्याच्या पीक तर गेलंय, आता नव्यानं पेरणी करणं अवघड आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहिर केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. (Maharashtra News)

कृषिमंत्री म्हणाले ओल्या दुष्काळाची स्थिती नाही आणि तेच मंत्री गुडघाभर पाण्यात फिरत असल्याचे फोटो टाकले. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात, तशाच आत्महत्या राजभरात घडल्या आहेत. सरकार दुर्लक्ष करतंय, हे सरकार दिवाळी किटची घोषणा करतं, तीन दिवसात टेंडर काढतं, शंभर रुपये पण घेतले जातात, स्वतःचे फोटो लावण्यासाठी किट देणे थांबवले असा आरोप यावेळी दानवे यांनी केला आहे.

Ambadas Danve News
ST Bus Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसला भीषण अपघात; अपघातात बस उलटली

पुढे दानवे म्हणाले की, या किटबाबत कोर्टात जाईन, ठाण्यात या किटसाठी 300 रुपये मागितले गेले. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर केवळ कृषिमंत्री पाहत आहेत, मात्र इतर कोणतेही मंत्री फिरकले नाहीत. पीक विमा कंपन्या आपलं स्वतःचं पोट भरण्याचे काम करतायत, सूचना देण्यासाठी त्यांचे टोल फ्री क्रमांक नाहीत, त्यांच्याकडे माणसे नाहीत असं म्हणत त्यांनी पीक विमा कंपन्यावरही हल्लाबोल केला आहे. तसेच पावसाची मोजणी करण्याची यंत्रणा नसल्यानं अतिवृष्टीची नोंद झाली नाही असाही दावा यावेळी त्यांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com