Jayakwadi Dam Water Storage Saam TV
महाराष्ट्र

Jayakwadi Dam Water : खुशखबर! जायकवाडी धरण काठोकाठ भरलं, मराठवाड्याचं वर्षभराचं टेन्शन मिटलं; वाचा आजची आकडेवारी

Satish Daud

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

गेल्या आठवड्यात नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गंगापूरसह इतर धरणांमधून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्याने नाथसागरात ३४ हजार ३३८ क्युसेकने पाण्यामी आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचा एकूण पाणीसाठा ८७.०३ टक्के इतका झाला आहे.

अशातच कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात विसर्ग केला जाऊ शकतो, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बघता त्याअनुषंगाने रविवारी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीवर धरणाचे दरवाजे उघडण्यावर चर्चा झाली आहे. या संदर्भात एक पत्रही अधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान पाऊस

रविवारी सकाळपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे अजिंठा डोंगररांगातील ओढे आणि वाघूर नदीला पूर आलेला आहे. यंदाच्या पावसाळ्यातला हा सर्वात मोठा पाऊस आहे. आत्तापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे पिकांना आधार मिळाला होता. मात्र आजच्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत.

कधी कधी जोरदार तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वारसा असलेल्या अजिंठा लेणीच्या परिसरातही रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अजिंठा डोंगर रांगातून पडणाऱ्या पावसाचे रौद्ररूप अनुभवायला मिळत आहे. अजिंठा डोंगर रांगातल्या अजिंठा लेणीतील वाघुर नदीला पूर आला आहे.

अजिंठा लेणीताला धबधबा असा रोधरूप धारण केलेला आहे. ओसंडून वाहणाऱ्या या धबधब्यामुळे अजिंठा लेणीचे रूपच पालटून गेले आहे. दरम्यान, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात कालपासून पावसानं जोर धरला आहे. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या ४८ तासांत छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी शक्यता आहे. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीच पाणी दिसू लागले आहे. नदीला यांना पुरासारखी परिस्थिती हळूहळू निर्माण होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT