Jay Pawar Emotional Post For Mom Sunetra Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Jay Pawar: आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान, जय पवारांची आईसाठी भावनिक पोस्ट

Jay Pawar Emotional Post For Mom Sunetra Pawar: जय पवार यांनी वडिलांच्या आठवणीत पुन्हा भावनिक पोस्ट केली. आईचा इमोशनल व्हिडीओ पोस्ट करत जय पवार यांनी 'आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे', असे या पोस्टमध्ये लिहिले.

Priya More

Summary -

  • जय पवार यांनी आई सुनेत्रा पवार यांच्यासाठी भावनिक पोस्ट शेअर केली

  • अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला

  • जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले

  • त्यांचा अजित पवार यांच्या आठवणीत रडतानाचा व्हिडीओ जय पवारांनी शेअर केला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला १९ दिवस पूर्ण झाले. अजित पवार यांचे अकाली निधन झाले. बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये त्यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. अजूनही अजितदादा आपल्यात नाहीत यावर अनेकांना विश्वास बसत नाहीये. अजितदादांच्या आठवणीमध्ये त्यांचे चिरंजीव जय पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

जय पवार यांनी आई सुनेत्रा पवार यांचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे. या व्हिडीओमध्ये सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अजित पवार यांच्या आठवणीत अश्रू आल्याचे दिसत आहे. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसंच त्यांनी पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या एका बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना सर्वांशी संवाद साधताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्या डोळे पुसून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या.

जय पवार यांनी सुनेत्रा पवारांचा अजितदादांच्या आठवणीत इमोशनल झालेला व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Dad नेहमीच आपल्या हृदयात आहेत आणि Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे' त्यापूर्वी त्यांनी इन्स्टा स्टोरीवर अजित पवार यांचा एक व्हिडीओ शेअर करत 'डॅड तुमच्या आठवणी नेहमीच जपून ठेवेन. मिस यू डॅड' असे लिहिले.

जय पवार यांनी फेसबुकला देखील सुनेत्रा पवार यांचा व्हिीडओ पोस्ट केला आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी इमोशनल कमेंट्स केल्या आहेत. एका कार्यकर्त्याने लिहिले की, 'स्वत:चे दु:ख गिळून उभ्या महाराष्ट्रासाठी लढणारी आमची माऊली' तर दुसऱ्या कार्यकर्त्याने लिहिले की, 'आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना इतकं दुःख होतंय तर ताईंच दुःख शब्दात मांडणे कठीण निशब्द' तर आणखी एकाने लिहिले की, 'दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळला असताना देखील केवळ आपल्यासाठी वहिनीसाहेब आज खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीडच्या परळी येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Child cancer myths: लहान मुलांमधील कॅन्सर संसर्गजन्य असतो? पालक करतायत ही गंभीर चूक, आधी सत्य जाणून घ्या

Maharashtra Infrastructure : मुंबई-नाशिकचा प्रवास मुंबई-पुण्यासारखा होणार, मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, १० हजार कोटींचा मोठा निर्णय

Dry Fruit Chocolate Recipe : लहान मुलांसाठी घरीच बनवा ड्रायफ्रूट चॉकलेट्स, वाचा कमी खर्चात होणारी हेल्दी रेसिपी

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी ६' चा विजेता ठरला? टॉप ५ मध्ये कोण? अभिनेत्याची 'ती' पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT