सुनेत्रा पवारांची इच्छा नसतानाही शपथविधी; त्या चार-पाच लोकांनी... पवारांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Sunetra Pawar Oath Taken Against Her Will: अजित पवार यांच्या निधनावर संशय व्यक्त करत रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल. सुनेत्रा पवारांची इच्छा नसतानाही शपथविधी झाल्याचा गंभीर आरोप.

रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या निधनावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच सुनेत्रा पवार यांची इच्छा नसतानाही त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली असावी अशी शक्यता वर्तवली आहे. त्या नेत्यांकडे सत्ता आहे. राज्यात ती मेंटेन ठेवण्यासाठी ती सत्ता तशीच राहावी म्हणून ती गोष्ट महत्वाची असेल. मूळ विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्या विषयाकडे त्यांचे लक्ष गेले. काकींची इच्छा नसताना त्यांनी त्यांना शपथ दिली असावी. सर्वांच्या प्रायोरिटी वेगळ्या आहेत. नेत्यांना काय महत्वाचे आहे हे गेल्या काही दिवसांपासून सर्वांना माहीत आहे. असे रोहित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com