Jaundice outbreak continues in Rajur saam tv
महाराष्ट्र

Jaundice: अहिल्यानगरमधील राजूर गावात काविळीचं थैमान सुरूच; 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू, शेकडोंवर उपचार सुरु

Jaundice: सध्या दूषित पाण्यामुळे अनेक आजार मागे लागतात. असंच अहिल्यानगरमधील राजूर गावात कावीळीने थैमान घातलं आहे. यामध्ये एका २२ वर्षीय तरूणीला आपला जीव गमवावा लागला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावात काविळ आजाराने थैमान घातलं आहे. यावेळी उपचार सुरू असताना प्रियंका शेंडे या 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कावीळच्या आजाराने नागरिक धास्तावले असून आज आठवडा बाजारही बंद ठेवण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील राजूर गावात गेल्या 15 दिवसांपासून काविळ आजाराने थैमान घातले आहे. दुषित पाण्यामुळे शेकडो नागरीक बाधित झाले असून शासकीय त्याचप्रमाणे अनेक खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रियंका शेंडे या 22 वर्षीय तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.. काविळच्या थैमानामुळे नागरीक धास्तावले असून आजचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने उपापयोजना सुरू केल्या असल्या तरी लवकरात लवकर काविळचा फैलाव थांबवणं गरजेचं आहे.

कावीळ कशामुळे होते?

कावीळ ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील बिलीरुबिनचं प्रमाण वाढतं. परिणामी त्वचा आणि डोळे पिवळे होतात. ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. यामध्ये यकृताचे नुकसान, पित्ताशयाचे खडे, संसर्ग, किंवा काही अनुवांशिक विकार यांचाही समावेश आहे.

कावीळीची लक्षणं काय दिसून येतात?

  • त्वचा पिवळी होणं

  • डोळे पिवळे होणे

  • लघवीचा रंग गडद होणं

  • मल फिकट रंगाचा होणं

  • उलट्या आणि मळमळ

  • भूक न लागणं

  • पोटदुखी

  • अस्पष्ट वजन कमी होणं

कावीळ झाल्यानंतर कसे उपचार घ्यावे लागतात?

कावीळीवर कसे उपचार करावेत हे त्याची कारणं आणि तीव्रता यावर अवलंबून असतं. सौम्य कावीळ काही दिवसांत आपोआप बरी होऊ शकते. तर गंभीर कावीळ झाली असल्यास त्यासाठी डॉक्टरांकडून योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

SCROLL FOR NEXT