Narayan Rane Saam Tv
महाराष्ट्र

ती वेळ मी येऊ देणार नाही; नारायण राणेंचे आश्वासन

सुमीत सावंत, अमोल कलये

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन जन आशीर्वाद यात्रेस प्रारंभ केला. त्यावेऴी त्यांच्या समवेत भाजप नेते आशिष शेलार, नितेश राणे आदी उपस्थित हाेते. राणे narayan rane यांचे रत्नागिरीत आगमन हाेताच त्यांचे ढाेल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभुमीवर याेद्धा पुन्हा मैदानात अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. दरम्यान जन आशीर्वाद यात्रेस प्रारंभ झाला असून चाैका चाैकात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. कायदा व सुववस्था राखण्यासाठी पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त आहे.

रत्नागिरी येथे आंबा उत्पादक आनंद देसाई यांच्या आंबा प्रक्रिया उद्याेगास भेट दिली. त्यावेळी अनेकांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. तेथे केलेल्या छाेट्याखानी भाषणात नारायण राणे म्हणाले मला उद्याेग व्यावसायिकांनी निवेदनं दिली आहेत. आंबा, काजू बागायतदारांशी त्यांनी चर्चा केली. एका बागायतदाराने आमचे प्रश्न साेडवा अशी मागणी केली. अन्यथा आम्हांला आत्महत्या करावी लागेल असे एका बागायतदाराने मला सांगितले. मी त्याला सांगितले ती वेळ मी येऊन देणार नाही.

बागायतदारांच्या प्रश्नांचा अभ्यास करुन न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन. मी देशाचा मंत्री असलाे तरी काेकणातूनच आलाे आहे. पदाचा उपयाेग काेकणासीयांना मिळावा यासाठी प्रयत्न करीन अशी ग्वाही राणेंनी दिली.

दरम्यान आज सायंकाळी सिंधूदूर्गात जन आशीर्वाद पाेहचणार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT