अहिल्यानगरच्या पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार
या हल्ल्यात त्याला चार गोळ्या लागल्या
गुंड सागर मोहोळकरची कुंडली आली समोर
सुशील थोरात, साम टीव्ही
अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये सागर मोहोळकर या पैलवानावर बुधवारी रात्री जामखेड शहरात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. सागर मोहोळकर याला चार गोळ्या लागल्यात. त्याच्यावर आता पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोहोळकरला चार गोळ्या लागूनही अद्यापही मृत्यूशी झुंज देतोय. जामखेडमध्ये गोळीबाराचा घटनाक्रम समोर आला आहे.
पैलवान असलेला सागर मोहोळकर हा कुख्यात गुंड आहे. त्याच्या विरोधात जामखेड तालुक्यात खंडणी, मारहाण करणे, जिवे मारणे, जीव मारण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने गुंड निलेश घायवळ याला कानाखाली लगावली होती. मागील वर्षी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान आयोजित कुस्ती स्पर्धेत त्याने गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावली होती. घायवळला कानाखाली लगावल्यानंतर सागर अनेक जणांच्या टार्गेटवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका हत्येच्या प्रकरणात जेलमध्ये असताना त्याने एका सहकारी कैद्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो कुस्तीचे डाव टाकून नागरिकांना उचलून फेकायचा. त्यामुळे नागरिक जायबंदी होत असत.नाशिक जेलमधून सुटल्यानंतर त्याने जामखेड येथील जुन्या भांडण्याच्या कारणातून तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली. या मारहाणीचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मात्र याप्रकरणी त्या तरुणांनी पोलिसांमध्ये कोणतेही तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जामखेडमधील त्याच्या दहशतीमुळे तो ज्या रस्त्याने येत असेल, त्याच्या समोरून अनेक जण रस्ता बदलायचे.
काही काळापासून तो विस्मरणात गेल्यासारखं करायचा. त्याने तळहातावर नाव लिहून ठेवून समोरच्या ओळख पटवायचा. गजनी सिनेमातील हिरो हात, कागदावर नाव लिहून समोरच्याची ओळख पाठवत असे, त्याचप्रमाणे सागर देखील तळहातावरणावर लिहीत असे असे माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. त्याच्यावर बुधवारी रात्री गोळीबार झाला, त्यावेळी सुद्धा सागर याच्या तळहातावर तीन जणांची नावे लिहिली होती. आता ही नावे आरोपींची आहे का, यामध्ये अजून दुसरा काही प्रकार होता. याबाबत पोलीस तपास करत आहे.
गुंड निलेश गायवळ याला मारल्यानंतर सागर चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे बुधवारी रात्री झालेला गोळीबारात मागच्या वादाचे काही धागेदोरे आहेत का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. एवढेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी सागर मोहोळकर याच्या वडिलांनी सागर याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये महाराणीची तक्रारही केली होती. त्यामुळे आता पोलीस दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.