Jalyukt Shivar Mission Saam Digital
महाराष्ट्र

Jalyukt Shivar Mission: एल नीनोवर कशी केली मात ? जलयुक्त शिवार अभियानावर होणाऱ्या आरोपांवरून देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Jalyukt Shivar Mission News: एल नीनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडला. त्यामुळे संपू्र्ण राज्याला पाणी कसं द्यायचं हा प्रश्न सरकार समोर होता. मात्र सरकारने या आव्हानातून संधी शोधली आणि जलयुक्त शिवार अभियानातून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Sandeep Gawade

Jalyukt Shivar Mission

एल नीनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडला. त्यामुळे संपू्र्ण राज्याला पाणी कसं द्यायचं हा प्रश्न सरकार समोर होता. मात्र सरकारने या आव्हानातून संधी शोधली आणि जलयुक्त शिवार अभियानातून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. आज संपूर्ण राज्यातून जलरथ जाणार आहे. याची सुरुवात श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीतून होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत जलरथ अभियानाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं, यावेळी ते बोलत होते.

नैसर्गिक संसाधनं वापरण्याविषयी जागरूकता हवी

दुर्दैवानं आपल्या सर्वांची मानसिकता अशी झाली आहे की नैसर्गिक संसाधनं कशीही वापरली तरी चालतात. त्याचा परिणाम आजच्या परिस्थितीवरून लक्षात येतोय.अर्ध्या महाराष्ट्रासाठी जलसंधारणाशिवाय पाणी उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार आणि अन्य योजना आणल्या. जलयुक्तमुळे मोठ्या प्रमाणात गावागावात पाणी उपलब्ध करू देता आलं.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक आरोप झाले मात्र न्यायालयाने अहवाल स्वीकारला

जमिनीचा पोत खराब होतो, भूजल पातळीवर परिणाम होतो असे आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आले. मात्र उच्च न्यायालयाने तज्ज्ञ समितीचा अहवाल स्वीकारला आणि भूजल पातळीत वाढ झाली हे मान्य केलं. जलयुक्त शिवार अभियानावर शिक्कामोर्तब केलं. याकाळात लोकसहभागातून योजनेचं काम झालं बुलढाणा जिल्ह्यात जिथे दुष्काळ पडायचा, तिथे आता लोक बागायती शेती करत आहेत.

फडणवीसांना दाखवले काळे झेंडे

नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांना दाखवले काळे झेंडे दाखवले आहेत. दरम्यान पोलिसांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. या स्पर्धांचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT