Jalna Accident Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Accident: मुलीला आजारपणाने ग्रासलं, रुग्णालयात नेताना काळाचा घाला; ५ जणांच्या अख्ख्या कुटुंबाचा शेवट

Accident News: जालन्यामध्ये भरधाव कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना राजुर–टेंभुर्णी रस्त्यावरील गाढेगव्हाण फाट्यावर घडली.

Priya More

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालन्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजुर–टेंभुर्णी रस्त्यावरील गाढेगव्हाण फाट्यावर आज सकाळी सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये कार कोसळून ५ णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आजारी असलेल्या लेकीला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या आईसह भावांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.भोकरदन तालुक्यातील कोपरडा गावातून सुलतानपूरकडे भरधाव वेगात जाणारी ही कार रस्त्यालगत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीला धडक देत विहिरीचे कठडे तोडून थेट विहिरीत कोसळली.

या अपघातामधील मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या अपघातात मृतांची ओळख पटली असून ज्ञानेश्वर डकले, पद्माबाई भांबीरे, निर्मलाबाई डकले, ज्ञानेश्वर भांबीरे आणि आदिनाथ भांबीरे यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसून मृतदेह आणि कार बाहेर काढण्यात आली आहे.

आई आपल्या आजारी असलेल्या लेकीला उपचारासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथे घेऊन जात असताना जालन्यातील गाढेगव्हाण फाट्यावर विहिरीत कार कोसळून दुर्दैवी अपघात झाला. या अपघातामध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे डकले परिवार आणि भांबिरे परिवार या दोन्ही परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात निर्मलाबाई डकले (आजारी लेक), पद्माबाई भांबीरे (आई), ज्ञानेश्वर डकले (दीर), ज्ञानेश्वर भांबीरे (भाऊ) आणि आदिनाथ भांबीरे (भाऊ) यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT