14-year-old boy drowns in Jalna Saam TV News Marathi
महाराष्ट्र

बैल धुण्यासाठी शिक्षकाची नजर चुकवून गेला, बैलपोळ्याआधी मुलाचा दुर्दैवी मृत्यू, जालन्यात खळबळ

Jalna Tragedy: जालन्यात बैल धुण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय तरुणाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जालन्यातील परतूर तालुक्यातील खांडवीवाडी शिवारातील घटना घडली आहे. बैलपोळ्याआधी दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

  • जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथे १४ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून मृत्यू

  • बैलपोळा सणापूर्वी बैल धुण्यासाठी गेला असताना पाय घसरून पाण्यात पडला

  • शिक्षकांनी सुट्टी नाकारल्यामुळे मधल्या सुट्टीत नजर चुकवून घरी आला होता

  • या घटनेमुळे गावात शोककळा पसरली, सुरज कदम हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

14-year-old boy drowns in Jalna while washing bull before Bail Pola : जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बैलपोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जालन्यातील परतुर तालुक्यातील खांडवीवाडी शिवरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सुरज कदम असं मयत मुलाचे नाव आहे. सुरज गुरूवारी गावाजवळील असणाऱ्या खदानीवर बैल धुण्यासाठी गेला होता. बैल धुत असताना सुरजचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. जवळ असलेल्या ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीने रुग्णात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सुरजला तपासून मृत घोषित केलं. दरम्यान पोळा सणाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..

बैल धुण्यासाठी शिक्षकांनी नाकारली होती सुट्टी

बैल धुण्यासाठी सुरजने शिक्षकाला सुट्टी मागितली होती, मात्र शाळा सोडून बैल धुण्यासाठी जाण्यास शिक्षकांनी परवानगी दिली नाही. मात्र मधल्या सुट्टीत शिक्षकांची नजर चुकवून सूरज घरी आला. आपल्या चुलत्यासोबत गावाजवळ असणाऱ्या खदानीवर बैल धुण्यासाठी गेला. गावातील अनेकजण यावेळी बैल धुण्यासाठी खादानीवर आले होते. मात्र सगळे बैल धुण्यात मग्न असताना पाय घसरून सूरज पाण्यात बुडाला..

परिसरात हळहळ

बैल धुण्यासाठी गेलेल्या सुरज कदम याचा खदानीत बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरज हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे .त्याचा अचानक पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहद व्यक्त करण्यात येत आहे.सुरजच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्याने खांडवीवाडी गावावर शोककाळा पसरली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT