Jalna to Jalgaon railway Route  Saam TV
महाराष्ट्र

Jalna-Jalgaon Railway : खुशखबर! जालना-जळगाव रेल्वे धावणार, कोणकोणत्या तालुक्याला थांबा मिळणार? जाणून घ्या...

Satish Daud

मराठवाड्यातील नागरिकांसाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जालना ते जळगाव रेल्वे मार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. यामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला जोडला जाणार आहे. 174 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी तब्बल 7 हजार 105 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जालना ते जळगाव (Jalna to Jalgaon Railway) रेल्वे महामार्गामुळे मराठवाड्यातील दळणवळण गतिमान होणार आहे. त्याचबरोबर अजिंठा आणि वेरुळ या जागतिक दर्जाच्या पर्यटनास्थळांवर पोहचणे देखील सुलभ होणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीवर केंद्र सरकारची नजर आहे. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील (Maharashtra) आपली सत्ता कायम राहावी, यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. नुकताच एनडीए सरकारच्या तिसऱ्या अर्थसंकल्प पार पडला होता.

या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणतेही विशेष पॅकेजची घोषणा न झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला होता. इतकंच नाही, तर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन देखील केले होते. यावरून विरोधक विधानसभा निवडणुकीत खोटा नॅरेटिव्ह पसरवू नये म्हणून सत्ताधाऱ्यांकडून या रेल्वे प्रकल्पाला मंजूरी दिल्याचं बोललं जातंय.

जालना-जळगाव रेल्वेला कुठे मिळणार थांबा?

जालना-जळगाव रेल्वेमार्गाचा अनेकवेळा सर्व्हे करण्यात आला. त्यामुळे नेमका रेल्वेमार्ग कोणत्या तालुक्यातून जाणार? असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना पडला. प्राप्त माहितीनुसार, रेल्वेमार्ग हा जालना येथून भोकरदन तालुक्यात येईल. तिथे रेल्वेला थांबा देण्यात येईल.

त्यानंतर सिल्लोडच्या दिशेने रेल्वेमार्ग वळवण्यात येईल. सिल्लोडनंतर रेल्वेमार्ग थेट अजिंठा आणि पहूर मार्ग जामनेर तसेच जळगावला जोडला जाईल. अजिंठा लेणी परिसरात देखील या रेल्वेमार्गाला थांबा असेल. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिीतनुसार, येत्या 5 वर्षात या रेल्वेमार्गाचे काम सुरू होऊ शकते. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला जाईल की नाही? याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Benefits: रात्री झोपताना नारळ पाणी पिण्याचे फायदे?

Asian Hockey Champions Trophy 2024 : टीम इंडियाने पांचव्यांदा जिंकली आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन

Pune News : पुणेकरांची लवकरच होणार वाहतूक कोंडीतून सुटका! PMC आणि RTO ने आखला मास्टर प्लान

Ajit Pawar : विसर्जन मिरवणुकीत अजितदादांच मोठं विधान; पहा Video

SCROLL FOR NEXT