भरपावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत जायकवाडीचा पाणीसाठी तब्बल १० टक्क्यांनी वाढला आहे. सध्या धरणात ३७ हजार ८९५ क्युसेक आवक सुरू आहे. त्यामुळे हा पाणीसाठा आणखीच वाढण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा (Jayakwadi Dam Water Lavel) आज सकाळी २५ टक्क्यांवर पोहचलाय. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पालखेड, निळवंडे, गंगापूर धरणं काठोकाठ भरली आहेत.
तसेच ओझरवेर, दारणा, भावली कडवा, नागमठाण, नांदूर मध्यमेश्वर, भंडारदरा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. परिणामी गोदावरी नदीला (Godavari River Water) पूर आला असून जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात आवक वाढली आहे.
सध्या जायकवाडी धरणातील एकूण पाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहचला आहे. पुढील २४ तासांत हा पाणीसाठा आणखीच वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारपासून नाशिक मधील गंगापूर धरणाचा विसर्ग बंद केल्यामुळे आवक कमी झाली आहे.
मराठवाड्यात प्रकल्प आणि धरणात पाणीसाठा वाढेल इतका पाऊस नसला तरी जायकवाडी धरणात मात्र नगर नाशिकच्या पावसाने पाणी दिले आहे. जायकवाडीमध्ये जमा झालेल्या या पाण्यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसोबतच नगर जिल्ह्यातील काही गावांची चिंता मिटली आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.