अमर घटारे, साम टीव्ही अमरावती
सोशल मीडियावर रील बनवून हिरो बनण्याच्या नादात काहीजण आपला जीव धोक्यात टाकतात. परिणामी अपघाताच्या मोठमोठ्या घटना घडतात. काही दिवसांपूर्वी सातारा येथील सज्जनगडावर रील बनवताना एक तरुणी 250 फूट खोल दरीत कोसळली होती. सुदैवाने झाडात अडकल्याने या तरुणीचा जीव वाचला होता. अशीच काहीशी घटना अमरावतीत घडली आहे.
इन्स्टाग्रावर रील्स बनवताना तरुण-तरुणी तब्बल 50 फूट खोल खाणीत पडले. अमरावती (Amravati News) शहराजवळच्या मासोद येथील गट्टी खदान परिसरात ही घटना घडली. या घटनेत तरुण-तरुणी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
या थरारक घटनेचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आलाय. व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडालाय. तरुण आणि तरुणी दोघांचेही वय अवघे १७-१८ वर्ष असल्याचं सांगितलं जातंय. दोघेही अवघे 17-18 वर्षांचे असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरील तरुण आणि तरुणी रविवारी संध्याकाळच्या सुमारास गिट्टी खंदान परिसरात फिरायला गेले होते. येथे उत्खनन पूर्ण झाल्याने मोठा खड्डा पडला आहे. तेथे उभे राहून दोघेही रिल्स शूट करीत होते. यावेळी तरुणीचा अचानक तोल गेला आणि ती 50 फूट खोल खदानीत पडली.
तिला वाचवताना तरुण देखील खदानीत पडला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाचे कर्मचारी तेथे दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर रात्री साडेआठच्या सुमारास त्या दोघांना खाणीतून बाहेर काढण्यात यश आलं. तरुण-तरुणीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.