Maratha Reservation Protest in Jalna Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Protest Update: जालन्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गोंधळ; पोलिसांचा लाठीमार; झटापटीत ८ पोलिसांसह अनेक जखमी

Maratha Reservation Protest in Jalna : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गोंधळ; पोलिसांचा लाठीमार; झटापटीत ८ पोलिसांसह अनेक जखमी

लक्ष्मण सोळुंके

Maratha Reservation Protest in Jalna: जालन्यातील शहागड येथे पोलिसांनी मराठा आंदोलकांनावर पोलिसांनी लाठीमार केल्याची बातमी समोर येत आहे. पोलिसांकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आरोप, आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

जन आक्रोश आंदोलनानंतरही राज्य सरकराने आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्याने दोन दिवसांपासून जालन्यात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळल्यानंतर पोलिस त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली. याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही लाठीमार व अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, अशी प्राथमिक माहिती आहे.  (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक कालपासून उपोषण मागे घेण्याची विनंती करीत होते आणि आज उपोषण मागे घेणार असे ठरले सुद्धा होते. मराठा आरक्षण प्रश्न सुप्रीम कोर्टात असल्याने सद्या राज्य सरकार कायदेशीर लढाई करीतच आहे, असेही त्यांना सांगण्यात आले होते.

दरम्यान, याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलिस अधिक्षकांशी बोलले असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

SCROLL FOR NEXT