Jalna Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Jalna Water Shortage : जालना जिल्ह्यात १५८ गावात पाणी उपसा करण्यास बंदी; पाणीटंचाईच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Jalna News : राज्यात सर्वत्र पाणी टंचाईचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीसाठा आटत असल्याने अनेक शहरांमध्ये पाणी कपात करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: पाणीटंचाईचे चित्र जवळपास सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यात देखील पाणीटंचाईचे सावट पसरलेले आहे. यामुळे संभाव्य पाणीटंचाई भासणाऱ्या १५८ गावांमध्ये पाणी उपसा करण्यास जालना जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. अर्थात या गावातील विहिरींमधून ३० जूनपर्यंत उपसा करता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. 

राज्यात सर्वत्र पाणी टंचाईचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीसाठा आटत असल्याने अनेक शहरांमध्ये पाणी कपात करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जालना जिल्ह्यात देखील हि भीषणता आता जाणवू लागली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना करण्यास सुरवात झाली आहे. 

३० जून पर्यंत बंदी 

महाराष्ट्र भूजल भूवैज्ञानिकानी जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार जालना जिल्ह्यात १५८ गावे टंचाईग्रस्त दर्शवली असल्याने या गावांमध्ये पाणी उपसा करण्यास जालना जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. या गावांमध्ये ३० जूनपर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उद्भावावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या विहिरीमधील पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहे.

जालन्यात पुन्हा फुटली पाइपलाइन 

ऐन उन्हाळ्यात शहराला अंतर्गत पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. यामुळे पुन्हा एकदा शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. आठवडाभरात पाइपलाइन फुटण्याची ही दुसरी वेळ आहे. शहरातील मंगळबाजार, काद्राबाद आणि गांधीनगर भागातील २० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करणारी महानगरपालिकेची पाइपलाइन फुटली. यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. तब्बल दोन ते अडीच तास पाइपलाइन सुरू राहिल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT