Akola Heat Wave : सूर्य ओकतोय आग; राज्यभरात उष्णतेची लाट, अकोल्यातील तापमान ४४ अंशापार

Akola News : राज्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर सर्वत्र तापमान वाढले असून उष्णतेची लाट पसरली आहे. राज्यातील बहुतांश शहरातील तापमान हे ४० अंशाच्या पार गेल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे
Akola Heat Wave
Akola Heat WaveSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : राज्यात वाढलेले तापमानामुळे जणूकाही सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव येत आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून उष्णतेची लाट पसरली आहे. यातच मागील दोन दिवसांपासून अकोला महाराष्ट्रातला सर्वाधिक उष्ण शहर बनले आहे. कारण अकोल्यातील तापमान हे ४४.१ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. 

राज्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर सर्वत्र तापमान वाढले असून उष्णतेची लाट पसरली आहे. राज्यातील बहुतांश शहरातील तापमान हे ४० अंशाच्या पार गेल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. यातच अकोला शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. परवा अकोल्याचा पारा ४३.४ अंशावर होता. तर काल पुन्हा अकोल्याचा तापमानाचा पारा वाढून थेट तापमान ४४ अंशापार गेले आहे. 

Akola Heat Wave
Wardha : धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क येताय मासांचे तुकडे

दुसऱ्यांदा तापमान ४४ अंशाच्या पार 

अकोल्यात काल सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून या वाढत्या तापमानाचा परिणाम अकोल्याच्या जनजीवनावर झाला आहे. अकोला जिल्हा प्रशासनाने वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान ७ आणि ८ एप्रिलला या मोसमातील सर्वाधिक तापमान अर्थातचं ४४ अंशापर्यत तापमानाचा पारा गेला होता. आता पुन्हा तापमानाने ४४ अंश पार गेले आहे. 

Akola Heat Wave
Ujani Dam : उजनी धरण मायनसमध्ये; पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी, पाणी संकट उद्भवणार

यवतमाळात गाठला यंदाचा उच्चांक
यवतमाळ
: यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाटता पसरली असून गुरुवारी तर यवतमाळात ४३.४ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली. या वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे. तर उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील पारा वाढत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील उन्हाळी झळा तीव्र झाल्या असून कडाक्याची ऊन आणि तीव्र उखड्यामुळे नागरिक हैराण आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com