Gram Panchayat Election Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election: तीस वर्षानंतर होतेय मतदान; केंद्रीय मंत्री दानवेंच्या गावात बूथ कॅप्चर होण्याच्‍या शक्यतेने एसआरपी तुकडीची मागणी

तीस वर्षानंतर होतेय मतदान; केंद्रीय मंत्री दानवेंच्या गावात बूथ कॅप्चर होण्याच्‍या शक्यतेने एसआरपी तुकडीची मागणी

लक्ष्मण सोळुंके

जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जन्मगाव असलेल्या भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द गावातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणूकीसाठी तब्बल ३० वर्षानंतर मतदान होणार आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे हे गाव असून या गावातील मतदान बूथ कॅप्‍चर होण्याची शक्‍यता आहे. यामुळे येथे पोलिस नको तर एसआरपी तुकडीची मागणी केली आहे. (Live Marathi News)

गेल्या ३० वर्षांपासून जवखेडा खुर्द (Jalna News) ही सात सदस्यीय ग्रामपंचयत बिनविरोध केल्या जात असल्याने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे वर्चस्व या ग्रामपंचायतीवर राहिले. त्यातच (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीत सरपंचपदासह ३ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात या निवडणुकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच निवडणूक अधिकारी यांच्यावर दबाव आणून या ठिकाणी बूथ कॅप्चर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भोकरदन तालुक्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्या ऐवजी SRP ची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात यावी.

निवडणूक पारदर्शक व्हावी म्हणून या ग्रामपंचायतीचा समावेश अतिसंवेदनशील ग्रामपंचयात म्हणून करावी. कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील; अशी मागणीच त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केल्याने प्रशासन अत्ता काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भाजप विरूद्ध राष्‍ट्रवादी लढत

दरम्यान या ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भाऊजाई सुमन मधुकर दानवे यांच्या विरुद्ध सरपंच पदासाठी सुनिता संतोष दानवे यांनी राष्ट्रवादीच्या पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ३० वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. त्यामुळे पंचक्रोशीत या निवडणुकी विषयी चर्चाना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tarini Marathi Serial: अखेर तारिणीने केदारसमोर देणार प्रेमाची कबूल; पण पुढच्याच क्षणी घडणार मोठा अनर्थ

Shocking : सावत्र आई अन् मुलाच्या प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट, प्रियकराच्या आत्महत्येनंतर प्रेयसीने घेतला टोकाचा निर्णय

लोणावळ्यापेक्षा भारी आहे 'हे' ठिकाण! एकदा गेलात की परत यावेसे वाटणार नाही

Maharashtra News Live Update: इंधन टंचाईची अफवा करून हळदीचे लिलाव बंद करणाऱ्या हिंगोलीच्या बाजार समितीला जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

अडथळे आणू नका, संयमाला मर्यादा असते, जब भी मै घायल होता हुं, तब मै घातक होता हुं, भाजप आमदाराचा विखे पाटलांवर निशाणा

SCROLL FOR NEXT