Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : धांडेगावचे ग्रामस्थ मतदानावर टाकणार बहिष्कार, रस्त्याच्या प्रश्नासाठी गावकरी आक्रमक

Jalna News : जालन्यातील धांडेगाव ग्रामपंचायतने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिल आहे. या गावात जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता मंजूर झाला आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : गावात जाण्यासाठी पक्का रस्त्याचे काम मंजूर झाला असताना कंत्राटदाराकडून रस्त्याचे काम केले जात नाही. हि परिस्थिती आहे जालना जिल्ह्यातील धांडेगावातील आहे. दरम्यान रस्ता होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

जालन्यातील (Jalna News) धांडेगाव ग्रामपंचायतने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिल आहे. या गावात जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता मंजूर झाला आहे. मात्र कंत्राटदाराने या रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने गावकरी आक्रमक झाले आहे. भारत स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाली. तरीदेखील गावात जाण्यासाठी रस्ता नाही. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

दरम्यान जालन्यातील धांडेगाव येथील ग्रामस्थ रस्त्याच्या प्रश्नासाठी आक्रमक झाले असून पुन्हा एकदा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात रस्ता होत नसल्याने येणाऱ्या (Vidhan Sabha Election) विधानसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय धांडेगाव ग्रामस्थांनी  घेतलाय. यासंदर्भातील उल्लेख निवेदनात देण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT