Neck Darkness: मान आणि गळ्याभोवती खूप काळेपणा झाालाय? मग घरी करा हे सोपे उपाय, १ आठवड्यात दिसेल फरक

Shruti Vilas Kadam

कोरफड जेलचा वापर करा

ताजे कोरफड जेल मानेवर हलक्या हाताने लावा. काही मिनिटांनी धुवा. कोरफड त्वचेला मॉइश्चरायझ ठेवण्यास मदत करू शकते.

Skin care Routine | google

दही आणि ओट्सचा लेप

दही आणि बारीक केलेले ओट्स एकत्र करून मानेवर हलक्या हाताने लावा. काही मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यास मदत होऊ शकते.

Remove Dark Neck Naturally

बेसनाचा सौम्य लेप

बेसनात थोडे दही किंवा पाणी मिसळून पेस्ट तयार करा. मानेवर लावून काही वेळाने धुवा. मात्र त्वचेवर जोरात घासणे टाळा.

Remove Dark Neck Naturally

मॉइश्चरायझर वापरा

मान आणि गळ्याची त्वचा कोरडी राहू नये यासाठी नियमित मॉइश्चरायझर लावा. त्वचेची नैसर्गिक आर्द्रता टिकवून ठेवण्यास यामुळे मदत होते.

Remove Dark Neck Naturally

सनस्क्रीन लावायला विसरू नका

मानेला उन्हाचा थेट संपर्क होत असल्यास काळेपणा वाढू शकतो. त्यामुळे बाहेर पडताना मानेवरही ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे.

Skin care Routine | google

लिंबू थेट लावणे टाळा

काळेपणा कमी करण्यासाठी लिंबाचा रस थेट त्वचेवर लावण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. मात्र यामुळे जळजळ आणि त्वचेची संवेदनशीलता वाढू शकते, त्यामुळे हा उपाय टाळणे चांगले.

Neck Darkness

त्वचेची समस्या कायम राहिल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या

मान काळवंडण्यास घर्षण, सूर्यप्रकाश किंवा इतर त्वचाविषयक कारणे असू शकतात. काळेपणा अचानक वाढत असल्यास किंवा बराच काळ कायम असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Neck Darkness

Guava Benefits: सफरचंद खाण्यापेक्षा रोज 'हे' फळं खा; मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Guava Benefits | SaamTv
येथे क्लिक करा