Samruddhi Mahamarg Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर मोठा अपघात, दोन कार एकमेकांना धडकल्या; ६ जण जागीच ठार, ४ जखमी

Samruddhi Highway Accident : नागपूर येथून मुंबईच्या दिशेने राँग साईड येणाऱ्या कारने , जालन्यातील कडवंची गावाजवळ दुसऱ्या एका कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही कारमधील एकूण ६ जण जागीच ठार झाले आहेत.

Satish Daud

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. शनिवारी पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. नागपूर येथून मुंबईच्या दिशेने राँग साईड येणाऱ्या कारने , जालन्यातील कडवंची गावाजवळ दुसऱ्या एका कारला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात (Accident) दोन्ही कारमधील एकूण ६ जण जागीच ठार झाले आहेत. तर ४ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.

या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने केलेल्या उपाययोजनाही फोल ठरत आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग की मृत्युचा सापळा असाच प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील जालन्यातील () कडवंची गावाजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघात झाला. नागपूर येथून मुंबईच्या दिशेने राँग साईड येणाऱ्या कारने दुसऱ्या एका कारला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला.

या अपघातात एकूण ६ जण ठार झाले आहेत. तर ४ प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील मृतांची तसेच जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाही. सध्या पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane-Navi Mumbai Travel: ठाणे ते नवी मुंबई एअरपोर्ट प्रवास सुसाट, सहापदरी उन्नत मार्ग होणार तयार; कोणत्या वाहनांना किती टोल?

Maharashtra Live News Update : पुण्यातील पहिलं मंडळ ज्याने सोलार द्वारे वीज निर्मिती करत संपूर्ण मंडप उजाळल....

Shocking : भर बाजारात नवऱ्याने बायकोवर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ

खळबळजनक! मुंबईजवळ फक्त मुस्लिमांसाठी हलाल टाउनशिप| VIDEO

Maharashtra Politics : ठाकरे गटाला बसणार मोठा झटका? अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा

SCROLL FOR NEXT