Jalna Police Saam tv
महाराष्ट्र

Jalna Police : दारूची अवैध तस्करी; जालना पोलिसांची कारवाई, आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Jalna News : जालन्यात पिकअप वाहनातून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती जालना तालुका पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर वाहन ताब्यात

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: छुप्या पद्धतीने दारूची अवैध तस्करी सर्रासपणे केली जात आहे. मुळात यावर बंदी असताना देखील तस्करी केली जात असल्याचे जालना येथे झालेल्या कारवाईत समोर आले आहे. जालन्यात अवैधरित्या वाहतूक केली जाणारी तीन लाख रुपये किंमतीची दारू पोलिसांनी पकडली आहे. जालना तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

विदेशी बनावट मद्य तसेच देशी बनावटीच्या दारूची चोरून लपून तस्करी सुरूच आहे. अनेकदा या कारवाया झाल्या असताना तस्करी थांबत नाही. जालना येथे देखील अशाच प्रकारे कारवाई करत दारूची तस्करी रोखण्यात आली आहे. दरम्यान जालन्यात पिकअप वाहनातून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती जालना तालुका पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर वाहन ताब्यात घेतले. 

३ लाखाचा दारू जप्त 

पोलिसांनी वाहनाची झाडाझडती घेतली असता, त्यात तीन लाख रुपये किंमतीचा अवैध दारूचा साठा मिळून आला. त्यावरून पोलिसांनी चालकास ताब्यात घेऊन ३ लाख रुपये किंमतीचा अवैध दारू साठा आणि पिकअप वाहन असा एकूण ९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

येवल्यात दोन गावठी कट्टे, जिवंत कडतुससह तिघे ताब्यात
नाशिक : नाशिकच्या येवला पोलिसांनी २ गावठी कट्टे, जिवंत काडतुससह ३ जणांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाईट पेट्रोलिंग सुरू असून येवला शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुक्तीभूमी परिसरात सापळा रचून दुचाकीवर येणाऱ्या ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ गावठी कट्टे व जिवंत काडतुसे जप्त केली आहे. तर 1 जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये हॉटेल व्यवसायकावर धारदार शस्त्राने हल्ला

Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर

Dia Mirza: दिवाळी स्पेशल अभिनेत्री दीया मिर्झाचा शाही लूक, पाहा PHOTO

Pakistan Attack News : पाकिस्तानवर भीषण हल्ला; बलूचिस्तान-तालिबान्यांच्या हल्ल्यात १० सैनिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT