Jalna News
Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: भीषण पाणीटंचाईचे झाळा; पाण्यासाठी ग्रामस्थांचे टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

लक्ष्‍मण सोळुंके

जालना : जालना जिल्‍ह्यातील काही भागात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी घनसावंगी तालुक्यातील शेवगळ गावातील नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलनात सुरुवात केली आहे. (Live Marathi News)

घनसांगी तालुक्यातील शेवगळ गावात (Jalna News) गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न या गावात निर्माण झाला आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी रानावनात भटकंती करावी लागत आहे. याबाबत वारंवार प्रशासनाला कळवूनही कुठलीच कारवाई होत नाही. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलनास सुरुवात केली आहे.

जलजीवन मिशनने प्रश्‍न सोडवा

गावात कोट्यावधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र विहिरीला पाणी नसल्याने नळाला महिन्यातून एक ते दोन वेळेस पिण्यापुरते पाणीही मिळत नाही. यामुळे गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवावी यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही शासनाकडून कुठल्याच प्रकारची दखल घेत नसल्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने हे शोले स्टाईल आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही; तोपर्यंत हे शोले स्टाईल आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलन करत्या ग्रामस्थांनी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Water Supply News : यवतमाळकरांना मिळतेय आठ दिवसातून एकदाच पाणीपुरवठा, जाणून घ्या निळाेणासह चाेपडा धरणाचा पाणीसाठा

Summer Drinks: उन्हाळ्यात 'या' पेयांचे सोवन ठरेल आरोग्यासाठी धोकादायक

Nashik News : दुष्काळी परिस्थितीमुळे दोन एकर पेरूची बाग तोडली; शेतकऱ्याचे नुकसान

Abdu Rozik Wedding : ३ फूट उंचीचा बिग बॉस फेम अब्दू रोझिक लग्नबंधनात अडकणार, स्वत:नेच जाहीर केली लग्नाची तारीख

Shantigiri Maharaj: राज्यातील ६ लोकसभा मतदारसंघांमध्ये वारं फिरणार; शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा नेमका कुणाला? करणार जाहीर

SCROLL FOR NEXT