Atul Save Saam tv
महाराष्ट्र

Jalna Politics : जालन्यात पालकमंत्री म्हणून अतुल सावे पुन्हा नको; शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला विरोध

Jalna News : राज्यात महायुती सरकारने सत्ता स्थापन केली. मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर मंत्री पदाची शपथ घेतलेल्या ३९ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. आता पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली जाणार

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटप झाले आहे. यानंतर आता जिल्ह्याची धुरा सांभाळण्यासाठी पालकमंत्री पद दिले जाणार आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून पुन्हा अतुल सावे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा असून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानी मात्र अतुल सावे यांना विरोध केला आहे. 

राज्यात महायुती सरकारने सत्ता स्थापन केली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर मंत्री पदाची शपथ घेतलेल्या ३९ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. आता पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली जाणार असून जिल्ह्यासाठी पालकमंत्री कोण मिळणार याची चर्चा सध्या रंगत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात मागील वेळेस असलेले पालकमंत्री सावे यांना विरोध केला जात आहे. 

जिल्ह्यात रंगतेय चर्चा 

जालना जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीने भरघोस यश मिळवले आहे. जालना जिल्ह्यात पाचही आमदार महायुतीचे निवडून आले असले, तरी नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जालना जिल्ह्याला मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही. त्यामुळे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? याचीच चर्चा सध्या जिल्हाभरात रंगताना पाहायला मिळत आहे. 

शिवसेनेचा विरोध 

जालन्याच्या पालकमंत्रिपदी पुन्हा एकदा भाजपचे अतुल सावे यांना संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र मंत्री अतुल सावे यांना जालन्याच्या पालकमंत्रिपदी पुन्हा संधी देऊ नये; अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यामुळे आमदार अतुल सावे यांना संधी मिळते; कि अन्य कोणाकडे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सलग चौथ्या दिवशी उधाणाचा कोकण किनारपट्टीला फटका

BMC निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी कसली कंबर, ८ शिलेदार निवडले, कोणकोणत्या नेत्याला संधी?

AI in Heart Surgery: सोलापुरात एआयच्या मदतीने एकाच दिवशी तीन अतिजटील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी|VIDEO

Bank Scam : कर्नाळा बँकेचा ५०० कोटींचा घोटाळा, माजी आमदाराच्या १०२ एकर जमिनीचा होणार लिलाव

Apurva Gore: खणाची साडी अन् निखळ हास्य, अपूर्वाचा लूक पाहून चाहते घायाळ

SCROLL FOR NEXT