Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna : आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे स्वतःची बुवाबाजी चालवतात; अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांची जोरदार टीका

Jalna News : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनानंतर सरकारने दिलेल्या जीआर वरून मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे यांना धारेवर धरले. तर अभ्यासक आणि समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी देखील सडकून टीका केली

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: मनोज जरांगे हे आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची बुवाबाजी चालवत असून मुंबई आंदोलन दरम्यान मनोज जरांगे यांना शासनाने दिलेला ड्राफ्ट अगोदरच माहीत होता. केवळ सरकारचा जयजयकार करण्यासाठी त्यांनी गुलाल उधळला असल्याचा आरोप  मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील  यांनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या मुंबई आंदोलनानंतर सरकारने दिलेल्या जीआर वरून राज्यातील मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे यांना धारेवर धरले आहे. तर मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी देखील मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करत करत निशाणा साधला आहे. अगोदरच सरकार बरोबर ड्राफ्ट तयार करतात आणि मग नंतर अभ्यासकांना बोलून चर्चा करण्याचे नाटक करून समाजाची फसवणूक केल्याचे देखील त्यांनी सांगितले.    

आरएसएसचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप 

मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना सूत्रबद्ध पद्धतीने मनोज जरांगे टार्गेट करत आहेत. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचा देशभरातील आरएसएसचा अजेंडा ते राबवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मराठा समाजाने हजारो कोटी रुपये खर्च केले असून केवळ फुलांवर १०० कोटी खर्च केल्याचा देखील त्यांनी म्हटले आहे. 

आंदोलनातून समाजाचे नुकसान 

मराठा आरक्षणाचा हा जगन्नाथाचा रथ, मी एकटाच ओढतोय, असे मनोज जरांगे पाटलाला समज आहे. जरांगे पाटील हे चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालवून मराठा समाजाचे नुकसान करत आहेत. जरांगे मराठा समाजाच नाही; तर कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत. जरांगेची एकही मागणी वैद्य कायदेशीर, घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पद्धतीची नाही. जरांगे यांना कायदा आणि शासन आदेश, पुराव्याचा शासन आदेश, यातला फरक कळत नाही. हैदराबाद गॅझेटचा त्यांना अभ्यास नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur : सुरुंग फुटून अंगावर पडला दगड; शिरपूर तालुक्यातील जवानाला लद्दाख येथे वीरमरण

Maharashtra Live News Update: शिवभोजन थाळी केंद्र चालकाचे नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन

Gardening Tips : या सोप्या टिप्स वापरून घरीच उगवा हिरवीगार पालक

खासदाराच्या बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट, नंतर सासऱ्यानं भररस्त्यावर काठीनं मारलं; व्हिडिओ व्हायरल

Raigad Politics: आदिती तटकरे-भरत गोगावले खुर्चीला खुर्ची लावून बसले, कानात कुजबुजले, पालकमंत्रिपदाचा वाद मिटला?

SCROLL FOR NEXT