Girish Mahajan On Maratha Reservation Protest Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Andolan: 'आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या', गिरीश महाजनांची आंदोलकांना विनंती

Maratha Reservation Protest: 'आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या', गिरीश महाजनांची आंदोलकांना विनंती

Satish Kengar

Girish Mahajan On Maratha Reservation Protest: 

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अद्यापही सुरु आहे. त्यांनी मराठा आरक्षण मेलात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे.

यातच आज मंत्री गिरीश महाजन आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. महाजन यांनी त्यांना तुमची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या असं म्हटलं आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

गिरीश महाजन म्हणाले की, ज्या पद्धतीने लाठी हल्ला झाला तो व्हायला नको होता. गुन्हे मागे घेण्या बाबद विषय होता. त्याबाबद ही निर्णय लवकरच होईल. (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''तीन महिने झाले अधिकाऱ्याच्या बदल्यात झाल्या. त्यामुळे समितीचे काम संत गतीने सुरु झालं. अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि माहिती अधिकारी जसा आणला ते ही लगेचं झाले नाही, त्या प्रक्रियेला ही वेळ गेला. अत्ता तीन महिन्यात सरकार आलं. त्या अगोदर सरकार वेगळं होत. आमचं सरकार असताना आम्ही निर्णय घेतले. आम्ही उच्च न्यायालयापर्यंत गेलो. मात्र मागच्या सरकारने काहीच केले नाही.'' (Latest Marathi News)

दरम्यान, मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या महत्वाची बैठक होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

SCROLL FOR NEXT