मराठा आरक्षणच्या मागणीसाठी जालना तालुक्यातील कचरेवाडी गावातील 30 वर्षीय तरुणांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आज सोमवारी दुपारी पाच वाजल्याच्या सुमारास घटना घडली. स्वपान बाबुराव कचरे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. स्वपान कचरे हा तरुण हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय होता. (Latest Marathi News)
मनोज जरांगे यांची तब्येत खराब झाल्याची माहिती त्याला मिळाल्यापासून तो अस्वस्थ होता. कचरे याची सासुरवाडी शहागड असल्याने वारंवार तो जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी गावातील तरुणाशी चर्चा करत असल्याची माहिती गावातील त्याच्या मित्रांनी दिली. स्वपान याला एक सहा वर्षाची मुलगी आणि एक चार वर्षाचा मुलगा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आरक्षण मिळालं नाही तर माझ्या मुलांसाठी मी आत्महत्या करेल, असं तो वारंवार त्यांच्या काकाला सांगत होता. आज त्याचे काका कामानिमित्त जालना शहरात आले असताना त्याने ही टोकाची भूमिका घेत शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
स्वपानने आत्महत्या केल्याची घटना घडल्याची माहिती कळताच जालन्यातील मराठा समाजाच्या तरुणांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तरुणांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला आहे. स्वपानच्या आत्महत्येने गावावर शोककळा पसरली आहे.