jalna news Manoj Jarange Patil slams Ajit Pawar on maratha aarakshan  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: अजित पवार समाजापेक्षा मोठे नाहीत; मनोज जरांगे पाटील संतापले, नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil on Ajit Pawar: अजित पवारांनी मुंबईत ठाण मांडून अधिवेशन बोलवावं, तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Manoj Jarange Patil on Ajit Pawar

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालन्यात उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत सरकार आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत नाही, तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, आज जरांगे पाटील यांनी पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समाजापेक्षा मोठे नाहीत. त्यांनी बारामतीमधील साखर कारखान्याचा कार्यक्रम रद्द केला, याचं तुम्हाला का दुःख झालं. अजित पवारांनी (Ajit Pawar) मुंबईत ठाण मांडून अधिवेशन बोलवावं, तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

आमदारांनी मुंबईत, तर खासदारांनी दिल्लीत ठाण मांडून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, उद्घाटनाच्या नांदी लागू नये, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. उद्यापासून साखळी उपोषणाच्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू होणार असून 31 तारखेपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होईल, असंही जरांगे पाटील यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा बांधवांनी देखील जाहीर आवाहन केलं आहे. कुणीही आरक्षणासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, असं जरांगे म्हणाले. समाजाच्या प्रवाहात राहा, समाजाच्या विरोधात उभं राहून आंदोलन उभं करू नका, अशी विनंती देखील त्यांनी मराठा आंदोलकांना केली आहे.

अजित पवार यांचा बारामती दौरा रद्द

आरक्षण मिळेपर्यंत अजित पवार यांना बारामतीत पाय ठेवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. शनिवारी अजित पवार माळेगाव येथील कारखान्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. हा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा आंदोलकांनी दिला होता.

यासाठी मराठा आंदोलक कारखान्याच्या गेटवर ठिय्या मांडून होते. दरम्यान, अजित पवार यांनी आता या कार्यक्रमाला जाणं टाळलं आहे. त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे. दुसरीकडे दौरा रद्द झाला असला तरी, आमचा त्यावर विश्वास नाही. कार्यक्रमाची वेळ होईपंर्यत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT