Manoj Jarange Patil Health Update Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange News : मोठी बातमी! मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, उपोषणामुळे पोटात तीव्र कळा; मराठा बांधव चिंतेत

Manoj Jarange Patil Health Update : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे.

Satish Daud

जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे. मंगळवारी रात्री त्यांच्या पोटात प्रचंड वेदना जाणवत होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिलाय. मात्र, जरांगे यांनी उपचारास नकार दिला असून ते आमरण उपोषणावर ठाम आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मागील ४ दिवसांपासून जरांगे हे अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. आज बुधवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे. अन्न पाण्याचा त्याग केल्याने मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या पोटात प्रचंड वेदना जाणवत असल्यानं मोडून पडल्यासारखी स्थिती मनोज जरांगे यांची झाली होती.

तीव्र वेदना होत असल्यानं मराठा बांधव चिंता व्यक्त करीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने उपचार घ्यावेत, अशी विनंती अनेकांनी केली आहे. दुसरीकडे जरांगे यांनी मात्र, उपचार घेण्यास नकार दिलाय. जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यत मी माघार घेणार नाही, माझे उपोषण सुरूच राहणार, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट

दुसरीकडे पुणे न्यायालयाने मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू आहे. सुनावणीला दोनवेळा गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलंय. त्यामुळे मनोज जरांगे यांना अटक होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

SCROLL FOR NEXT