Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटलांचे उपोषण नवव्या दिवशी स्थगित

डॉ. माधव सावरगावे

जालना, ता. २५ सप्टेंबर

Manoj Jarange Patil Hunger Strike Protest: सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेत. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. डॉक्टर आणि मराठा बांधवांच्या विनंतीनंतर मध्यरात्री जरांगे पाटील यांनी उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी आज उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली. उपोषणस्थळी मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली असून जरांगेंना उपोषण सोडण्याची विनंती करताना महिलांचा आक्रोश पाहायला मिळतोय. दुसरीकडे आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्याही डोळ्यात पाणी आलं.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"आज प्रत्येक शिक्षक अन पोलीस आरक्षणाची वाट बघतोय. आज कोणतेच क्षेत्र असं नाही की तो आरक्षणाची वाट बघत नाही, प्रत्येक क्षेत्रातील मराठा आज आरक्षणाची वाट बघत आहे. फडणवीस साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे, माझा गरीब मराठा आरक्षणाची वाट बघतोय. तुम्हाला संधी आहे ही संधी वाया जाऊ देऊ नका, मी आता राजकीय भाषा बोलणार नाही आचारसंहितापर्यंत पण तोपर्यंत आरक्षण दिलं नाही तर त्यानंतर मी तुम्हाला कोणालाच सोडणार नाही. माझी भूमिका माझ्यासाठी नाही तर माझ्या समाजासाठी महत्वाची आहे. ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण द्या," अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

डोळ्यात पाणी...

"माणूस सलाईन घेतली तरी मरतो हे खरंय, तो केवळ 27 दिवस जगू शकतो. रात्री कलेक्टर साहेब, एसपी साहेब आले होते. मी तुम्हाला माझ्या वेदना दाखवत नाही. मात्र काल खूप त्रास झाला म्हणून त्या वेदना दिसल्या. मी हायकोर्टाचा सन्मान करतो, त्यांनी सांगितलं होतं सलाईन घ्या म्हणून मी सलाईन घेतल्या. चिखलात इथं येणाऱ्या बांधवांचे हाल होत आहेत, एकट्या फडणवीस साहेबांसाठी 9 दिवसांचा कडक उपवास झालाय. निवडणुकीपर्यंत जर आरक्षण दिल नाही तर सगळी निवडणूक बिघडवणार आहे, माझ्या स्वतःसाठी मी आंदोलने करीत नाही," असं ते म्हणाले. यावेळी मनोज जरांगेंच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

उपोषण स्थगित

"जर सरकारने आपल्या लेकराशी धोका केला तर तुम्ही आपल्या रक्ताच्या पोराशी धोका करू नका, पुन्हा पुन्हा त्यांना मतदान करून मोठं करू नका. हातजोडून विनंती आहे, नका पोरांचं वाटोळं करू. जो श्रीमंत माणूस आपल्या गरीब मराठ्यासोबत असेल त्याला मदत करा, मायबाप मराठ्यांनो आता भोळे राहू नका. आपलं ठरलंय तसं 20 - 20 लोकांच्या टीम तयार करा. आता माझं शरीर पूर्ण संपलय. मला चार पाच दिवसाच्या आरामाची गरज आहे, तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये येऊ नका.." असे म्हणत जरांगेंनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates: खडकवासला धरणातून २५६८ क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू

Chandrashekhar Bawankule : 'हे लुटारूंचं सरकार'; बावनकुळे यांच्या संस्थेला सरकारने भूखंड दिल्यानंतर विजय वडेट्टीवार कडाडले

Pune News : सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात पावसाची हजेरी

Kalyan Crime : ज्योतिषाकडे हात दाखवू म्हणून नेले अन् खुर्चीला बांधले; माजी नगरसेविकेच्या पतीसोबत घडले भयंकर

Mumbai Rain Update : मुंबईसह पुण्याला पावसानं झोडपलं; रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, भर पावसात नागरिकांची धावाधाव, VIDEO

SCROLL FOR NEXT