जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे शुक्रवारी (ता २०) रात्रीच्या सुमारास मोठा राडा झाला. मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी निघालेल्या मराठा बांधवांची वाहने पोलिसांनी बॅरिकेट्स लावून अडवली. त्या ठिकाणी काही ओबीसी बांधव देखील होते. यावेळी मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.
ही वार्ता मनोज जरांगे यांच्या कानी पडताच त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. मराठ्यांची वाहने अडवणारा पोलीस अधिकारी कोण? त्याचा इथे काय संबंध? मुख्यमंत्र्यांना आताच फोन लावा. त्याला इथूनच आऊट करतो, असा आक्रमक पवित्रा जरांगे यांनी घेतला.
यावेळी मराठा बांधवांनी जरांगे यांना शांत केलं. तसेच त्यांना उपचार घेण्याची विनंती देखील केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई आणि दीपक केसरकर यांच्यासोबत फोनवरूच चर्चा केली. मराठ्यांची वाहने अडवणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फे करा, अशी मागणी जरांगे यांनी केली.
दोन्ही मंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे शांत झाले. सध्या वडीगोद्री आणि अंतरवाली सराटी येथे तणावपूर्व शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपचार देखील घेतले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
डॉक्टरांनी जरांगे यांना सलाईन लावले असून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस आणि भुजबळ यांना महाराष्ट्रात दंगली घडवून आणायच्या आहेत, असं जरांगेंनी म्हटलंय.
छगन भुजबळ आणि परळी वाल्यांचे ऐकून उगाच भांडण विकत घेऊ नका. वडीगोद्री आणि आपले संबंध चांगले आहेत. धनगर बांधव आणि मराठ्यांचं चांगलं आहे. आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे जरांगे यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर देखील नाव न घेता जहरी टीका केली. आपण त्यांचं 13 महिन्यात नावं पण घेतलं का? त्यांच्या तोंडावर आपण थुंकतच नाही, असं जरांगे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.